जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र
व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे भडगाव येथे पत्रकार दिन साजरा
0
6
1
0
3
0
कार्यकारी संपादक – संजय महाजन
भडगाव – मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिननिमित्त भडगाव येथे व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेकडून शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे भडगाव तालुकाध्यक्ष अशोक परदेशी, शिवदास महाजन, विलास पाटील, विठ्ठल मराठे, अमीन पिंजारी, आत्माराम पाटील, संजय महाजन, नरेंद्र पाटील, गणेश आहिरे, जितेंद्र दीक्षित आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे भडगाव तालुका व शहरातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
6
1
0
3
0