कासोदा येथे हजरत बिजली शाह बाबा व हजरत मेहरबान शाह यांच्या उर्स निमित्त भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन…!
कासोदा येथे हजरत बिजली शाह बाबा व हजरत मेहरबान शाह यांच्या उर्स निमित्त भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन...!

सत्यकाम न्यूज उपसंपादक :-इमरान शेख
एरंडोल तालुक्यातील कासोदा शहरा येथील हजरत बिजली शाह बाबा व हजरत मेहरबान शाह बाबा यांच्या उर्स निमित्त बिजली शाह बाबा चौक आठवडे बाजर कासोदा येथे आगामी सोमवार रोजी दिनांक ६ जुलै २०२६ रोजी भव्य ‘कव्वाली महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सांगीतिक कार्यक्रमात देशातील सु प्रसिद्ध कव्वाल अजीम नाजा यांची प्रसिद्ध कव्वाली खाजा ‘तेरी बस्ती मे रेहमत बारस्ती हे सूफी संगीताची जादू प्रेक्षकांच्या मनावर चालवणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी:
हा कार्यक्रम दुपारी ठीक ०४:वाजता स्थळ: बिजली शाह बाबा चौक आठवडे बाजर येथे सु प्रसिद्ध कव्वाल अजीम नाजा यांची प्रसिद्ध कव्वाली चा कार्यक्रम सुरु होणार आहे
हा कार्यक्रम सर्वधर्मीय नागरिकांसाठी खुला असून, सूफी संगीत आणि भक्तीचा अनोखा संगम यामध्ये पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
आयोजक समितीचे अध्यक्ष राउफ खान मुक्तार खान व उपअध्यक्ष मुस्ताक शेख रजा केबल.साबीर भाई उत्रान. मेहबूब नेता. आणि समस्त मुस्लिम समाज यांनी विशेष परिश्रम घेत आहे. आयोजकांच्या वतीने परिसरातील तमाम रसिक नागरिकांना या कव्वाली महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे…
आयोजक समितीची सूचना मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या वर पोलीस प्रशासन कडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयोजक समितीची वतीनी देण्यात आला आहे…



