जुगार अड्ड्यावर छापा,१५ जुगारीं ताब्यात,कासोदा पोलिस ची कारवाई…!
जुगार अड्ड्यावर छापा,१५ जुगारीं ताब्यात,कासोदा पोलिस ची कारवाई...!

कासोदा प्रतिनिधी :-
एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन
अंतर्गत असलेल्या जवखेडे सिम गावी गलापूर रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडूपाच्या आडोश्याला जमिनीवर खाली घोळका करून काही जुगारी मिळून पत्यांचा खेळ-खेळत असल्याची गुप्त बातमी कासोदा पोस्टचे सपोनी. निलेश राजपूत यांना दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी दु. ०२ वाजता मिळाली असता. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार आपल्या सहकाऱ्यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक रवाना केले, सदर पथकास मिळालेल्या माहितीनुसार तेथे काही जुगारी पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचे दिसून आले. पंचा समक्षखात्री होत. दु. ०३:२५ वा. धाड टाकली असता, त्या धाडीत १५ जुगारी मिळून आले, त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी वीरभान श्रावण भिल, सोनू डाकू भिल, राहुल संतोष सोनवणे, संतोष माधव सोनवणे, प्रवीण वसंत सोनवणे, सुनील दगा ठाकरे, मांगीलाल भाईदास चव्हाण, रतन धाकू भिल, अशोक गोविंदा पाटील, सचिन बापू पवार, कांतीलाल महादू सोनवणे, उत्तम बालाआप्पा झेंडे, समाधान बापू पाटील, संभाजी महारु पाटील, सुनील सिताराम वाघ, सर्व राहणार जवखेडे सिम, तालुका एरंडोल असे सांगितले. यांच्या अंग झडतीत एकूण ६३९०रु. इतकी रोख रक्कम मिळून आली व १लाख १५ हजार रु. किमतीच्या दोन मोटर सायकली सह एकूण
१,२१,३९०रु. चामुद्देमाल जमा करण्यात आला. या सर्वांना कासोदा पोलीस स्टेशनला आणत पो.कॉ. दिपक देसले यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जमा करण्यात आलले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) भाग चाळीसगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शक व सुचने प्रमाणे
या घटनेचा पुढील तपास सपोनी. निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस करीत आहे,
सपोनी. निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. नंदलाल परदेशी पो.ना. प्रदिप पाटील, पोकॉ. समाधान तोंडे, निलेश गायकवाड, कुणाल देवरे, योगेश पाटील, प्रदिप देसले, लहू हटकर यांच्या पाथकाने केली.