Breaking
ब्रेकिंग

माझा एरंडोल मतदारसंघासाठी “सरसकट विशेष मदत पॅकेज” जाहीर करा – आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…!

माझा एरंडोल मतदारसंघासाठी "सरसकट विशेष मदत पॅकेज" जाहीर करा - आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...!

1 0 6 5 1 2

उपसंपादक इमरान शेख

एरंडोल , दि. ३१ जुलै  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगाव या तीनही तालुक्यांमध्ये शेती, गुरेढोरे, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अक्षरश अनेक कुटुंबांचे संसार महापुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.

या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल पारोळा भडगाव चे आमदार ॲड. अमोलदादा चिमणराव पाटील यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजित पवार आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद आबा जाधव साहेब आणि पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात आमदार अमोलदादा पाटील यांनी काय म्हटले?

आपल्या निवेदनात आमदार अमोलदादा पाटील यांनी स्पष्ट केले की, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले आहे, घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे NDRF व SDRF चे निकष शिथिल करून एरंडोल मतदारसंघासाठी सरसकट विशेष मदत पॅकेज जाहीर करावे अशी ठाम मागणी त्यांनी केली.

त्याचबरोबर प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करावेत कोणताही शेतकरी किंवा पूरग्रस्त नागरिक शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी, असेही आमदार अमोलदादा पाटील  त्यांनी सांगितले.

पुनर्वसन आणि आरोग्यावर भर

नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत वितरित करून त्यांचे जनजीवन पूर्ववत करण्यासाठी विशेष पुनर्वसन उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी विनंतीही आमदारा अमोल दादा पाटील यांनी केली आहे. तसेच पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छ पाणी आणि पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्यांचे वाटप करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

तातडीने निर्णयाची गरज

आमदार ॲड. अमोल दादा पाटील यांनी शेवटी म्हटले की, “पूरग्रस्त व संकटग्रस्त नागरिकांना या कठीण काळात शासनाचा भक्कम आधार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हा मानवी संवेदनांशी निगडित विषय असून यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन एरंडोल, पारोळा व भडगाव तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे.”

सध्या संपूर्ण मतदारसंघात मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना शासन लवकरात लवकर दिलासा देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 6 5 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे