Breaking
ब्रेकिंग

भडगाव शहर येथे बकरी ईद उत्साहात आणि शांततेत संपन्न; मुस्लिम बांधवांकडून भाईचारा व सलोख्याचे दर्शन…!

भडगाव शहर येथे बकरी ईद उत्साहात आणि शांततेत संपन्न; मुस्लिम बांधवांकडून भाईचारा व सलोख्याचे दर्शन...!

0 9 9 6 3 9

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव :-भडगाव शहर येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली बकरी ईद (ईद-उल-अधा) आज २८मे रोजी स्थानिक ईदगाह मैदान येथे अत्यंत उत्साहात, आनंदाने आणि शांततेत संपन्न झाली.

यानिमित्ताने शहरात सर्वत्र बंधुभाव आणि सलोख्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले.सकाळच्या सत्रात मुस्लिम बांधवांनी नवीन वस्त्रे परिधान करून ईदगाह मैदान आणि परिसरातील मशिदींमध्ये एकत्रितपणे ईदची विशेष नमाज अदा केली.

देशामध्ये शांतता, समृद्धी आणि ऐक्य नांदावे, यासाठी यावेळी विशेष दुवा (प्रार्थना) मागण्यात आली.

नमाज पठणानंतर उपस्थितांनी एकमेकांना मिठी मारून ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.सामाजिक सलोख्याचे दर्शनया सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी इतर धर्मीय मित्रांना आणि शेजाऱ्यांना बोलावून सलोख्याचे दर्शन घडवले. अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सणाच्या आनंदात सहभाग नोंदवला व

संवेदनशील भागात जादा पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती भडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एकशिंगे सर स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले होते।समाजाकडून सहकार्य.केले

प्रशासन आणि पोलिसांचा चोख बंदोबस्तकोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भडगाव शहर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी मशिदी व ईदगाह मैदानाबाहेर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांचे स्वागत केले.एकंदरीत, बकरी ईद आणि त्यागाचा संदेश देणारा हा सण भडगाव शहर मध्ये अत्यंत खेळीमेळीच्या आणि शांततेत संपन्न..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 9 6 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे