अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सामान्य ग्राहकास लोप पावलेले ग्राहक दैवत चे स्थान परत प्राप्त करून द्यावे ….आमदार राजू मामा भोळे
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सामान्य ग्राहकास लोप पावलेले ग्राहक दैवत चे स्थान परत प्राप्त करून द्यावे ....आमदार राजू मामा भोळे

कासोदा ता ,एरंडोल प्रतिनिधी:-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित वंदे मातरम् उत्सव कार्यक्रम प्रसंगी आमदार राजू मामा उर्फ सुरेश भोळे यांनी केले आवाहन .
जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार श्री मामासाहेब उर्फ सुरेश दामू भोळे जळगाव यांचे समवेत वंदे मातरम् ह्या राष्ट्रीय गीतांचे 150 व्या वर्ष च्या औचित्य साधत सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सन्मान चिन्ह ,शाल व पुष्पगुच्छ देत मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत अभिमानास्पद सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.या ऐतिहासिक सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव डॉ.अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲड .सुभाष तायडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री दिनेश तायडे ,जिल्हा कार्यालयीन प्रमुख श्री जे. एम.तळेले ,जिल्हा महिला प्रमुख सौ.निर्मला देशमुख, जिल्हा न्याय व विधी आयाम प्रमुख अँड.स्वप्नील पाटील , पाचोरा तालुका उपाध्यक्ष अँड.निलेश सूर्यवंशी , अँड.सचिन देशपांडे,जळगाव महानगर महिला प्रमुख श्रीमती ताईसाहेब विद्या ताई पाटील ,सचिव ताईसाहेब सौ.प्रतिभा सूर्यवंशी , जिल्हा सहकोशाध्यक्ष ॲड .देवा इनामदार , श्री दिलीप आबा सपकाळ ,एरंडोल तालुका अध्यक्ष श्री मुल्लाजी नुरुद्दीन, पत्रकार जैनूल शेख , आदी उपस्थित मान्यवर होते .
सत्कारमूर्ती व कार्यक्रमचे प्रमुख पाहूने जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार श्री राजू मामा भोळे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे डॉ.अनिल देशमुख , अँड.सुभाष तायडे,व जिल्हा महिला प्रमुख सौ.निर्मला देशमुख,महानगर प्रतिनिधी विद्याताई राजपूत व संपूर्ण टीम ने जिल्ह्यात ग्राहक पंचायत चे प्रबोधन व जनजागृती चे ग्राहक हितार्थ केलेल्या कार्याचा गौरव करीत , सर्वसामान्य ग्राहकास ग्राहक दैवत म्हणून पुनश्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असावे असे भावनात्मक आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात डॉ.अनिल देशमुख प्रांत सचिव यांनी गेल्या कालखंडात अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे माध्यमातून औषधी व इतर उत्पादनावा आकारण्यात येत असलेल्या भरमसाठ एम आर पी वर नियंत्रण व युवकाचे पिढीस अत्यंत घातक असणाऱ्या व्हिडिओ वर आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी व केंद्र सरकार यांनी आणलेला बंदी कायदा आणण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने घेतलेला पुढाकार तसेच अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचे कठोर अंमलबजावणी साठी करीत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचा उल्लेख करीत जिल्हाधिकारी व तालुका स्थरावर प्रांत व तहसीलदार यांचे अध्यक्षते खाली अखिल भारतीय ग्राहक पंचायत,रोटरी क्लब सारख्या सेवा भावी संघटन चे प्रतिनिधी चा समावेश असलेल्या अन्न भेसळ व विषबाधा प्रतिबंधक समिती ची पुनर्रचना 1997/ 98 पासून करण्यात यावी की जेणेकरून दूध व अन्य खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्याचे कार्य अधिक विस्तारित स्थरावर नियंत्रण करणे साठी शक्य व्हावी म्हणून महत्वपूर्ण मागणी साठी ग्राहक पंचायत चे सोबत सर्व लोकप्रतिनिधी नि तीव्रतेने लक्ष घालावे याकडे लक्ष वेधले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा अध्यक्ष अँड.सुभाष तायडे यांनी केले. तर सूत्रसंचालन जिल्हा न्याय व विधी समिती प्रमुख अँड.स्वप्नील पाटील यांनी तर ऋण निर्देशात्मक आभार श्रीमती विद्याताई राजपूत पाटील यांनी केले.



