भडगाव गिरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुल वाहतुकीसाठी केला पूर्णपणे बंद…
भडगाव गिरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुल वाहतुकीसाठी केला पूर्णपणे बंद...

भडगाव प्रतिनिधी :-
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून गिरणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.
त्यामुळे भडगाव-पारोळा-एरंडोल या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रविवार सकाळपासून नदीचा प्रवाह वाढत गेला आणि संध्याकाळपर्यंत पाणी पुलावरून वाहू लागले. वाहने पर्यायी मार्गाने वळवली जात असून प्रशासनाने पुलावरून जाण्यास कडक मनाई केली आहे.
तहसीलदार कार्यालय, नगरपरिषद, पोलीस प्रशासन आणि गिरणा पाटबंधारे विभाग यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, नदीकाठावर किंवा पुलावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नदीकाठच्या खेड्यांतील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन पथक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.