
ईद-ए-मिलादूनबी हा पवित्र सण एरंडोल तालुक्यातील कासोदा गावांमध्ये मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. दरवर्षी इस्लामिक चंद्र कॅलेंडरच्या रबी-उल-अव्वल महिन्याच्या १२ तारखेला हा सण साजरा केला जातो. इस्लामच्या मान्यतेनुसार, पैगंबर हजरत मुहम्मद (स.अ.व.) यांचा जन्म ५७० च्या सुमारास मक्का येथे झाला. समाजातील अंधार दूर करण्यासाठी आणि सत्य, शांती आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्यांचा जन्म झाला असे मानले जाते.
कासोदा गावांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मुस्लिम बांधवांनी आपली घरे आणि मशिदींना रोषणाईने सजवले. लोकांनी ईद ए मिलादुनबी हा दिवस योगायोग शुक्रवारी आल्यामुळे सकाळी सामूहिक फज्रची नमाज आणि जोहर ला जुमाची नमाज अदा केली आणि पैगंबर मुहम्मद (स.अ.व.) यांच्या आदर्शाचे स्मरण केले. या दिवशी अल्लाहची उपासना करण्यासाठी विशेष वेळ देण्यात आला. लंगर तबर्रुक नियाज, हलवा, आणि लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा आस्वादाचा आनंद सर्व मुस्लिम नागरिकांनी घेतला. कासोदा येथे जश्ने ईद मिलाद-उन-नबीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरीब नवाज चोकत तबर्रुक नियाज, हलवा, फळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,
कासोदा शहरातील मान्यवरांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा दिल्या आणि . ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या या उत्सवामुळे कासोदा शहरात बंधुता आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. सर्व धर्माच्या नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला.
यावेळी कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो. नि.निलेश राजपूत, पो.कॉ. नितिन सुर्यवंशी, योगेश पाटील, निलेश गायकवाड, राकेश खोंडे, श्रीकांत गायकवाड, नरेंद्र गजरे, नरेंद्र पाटील, कुणाल देवरे सोप्निल पाटील होम होमगार्ड यांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
स.पो.नि.निलेश राजपूत स्वतः शेवटपर्यंत मिरवणुक शांततेत पार पडावी म्हणुन गस्त ठेऊन होते.