(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगावः- तालुक्यातील मुलभूत सुविधांसाठीच नाही तर सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन विकासासाठीही हजारो कोटींच्या विकास निधीचा ओघ वाहत ठेवणा-या आ. मंगेश चव्हाण यांनी पाटणादेवी परिसराच्या वैविध्यपूर्ण विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळवित तालुकावासियांना नवरात्रोत्सवाच्या पर्वणीवर अनोखी भेट दिली आहे. यामुळे या पुरातन तीर्थ व पर्यटनक्षेत्राचा कायापालट होणार आहे. खान्देशातील एक प्रमुख धार्मिक व पर्यटन क्षेत्र असा यास्थळाचा लौकीक असून तो अजून वाढणार आहे.
पाटणादेवी हे चाळीसगाव तालुकावासियांचेच नव्हे तर अवघ्या खान्देशवासियांचेही कुलदैवत आहे. नवसाला पावणारी असे माता चंडिकेचे अधिष्ठान असून थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांची ही तपोभूमी आहे. पुराणकाळापासूनच यापरिसराचे मोठे वैशिष्ट्ये राहिले आहे. निसर्ग व प्राणी, पक्षी संपदेने हा परिसर सुजलाम-सुफलाम आहे. येथे गणितनगरी साकारण्याची स्वप्ने काहींनी दाखवली. मात्र गणित नगरीच्या नावाने एक वीटही त्यांना ठेवता आली नाही. राजकारण मात्र १० वर्ष केले. ही वस्तूस्थिती असून गेल्या अनेक वर्षात पाटणादेवी तीर्थक्षेत्राचा शाश्वत विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच निधी मिळविण्यात आ. चव्हाण यशस्वी ठरले आहे. निधी मंजूर झाल्याने भाविकांसह पर्यटन, पर्यारवणप्रेमी व खगोल अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे.
भास्कराचार्यांच्या जीवनप्रवासाला नाविन्यपूर्ण साज, जीवनदर्शन केंद्र उभारणार
थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांचा जन्म पाटणा येथे झाल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहे. भास्कराचार्यांनी या तपोभूमीत अनेकविध गणितीग्रंथांचा अविष्कार केला. ग्रहांचा अभ्यासही त्यांनी येथे केला असून त्यांची ही मौलिक ग्रंथसंपदा आजही खगोल अभ्यासकांना दिशा देत असते.
▪️भास्कराचार्य यांचे नातू चंगदेव यांनी १२व्या शतकात त्यांच्या वंशावळीचा शिलालेख कोरुन ठेवला आहे.
▪️हा शिलालेख येथील देवी मंदिरात उपलब्ध असून यामुळेच भास्कराचार्य यांच्या जन्म पाटणा येथेच झाला असून येथे त्यांनी तपसाधना केली आहे. याला पुष्टी मिळते.
▪️भास्कराचार्य यांचा जीवनप्रवास, तपोसाधना, ग्रंथनिर्मिती हा कुतूहलाचा विषय आहे. पाटणा येथे भास्कराचार्य इनोव्हेटीव्ह सेंटर उभारण्यात येणार आहे. यात त्यांचा जीवनप्रवास मांडण्यात येणार आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
भक्त निवासही उभारणार
पाटणादेवीचे स्थान महात्म्य लक्षात घेऊन भाविकांसाठी भक्त निवास उभारण्यात येणार आहे. यासाठीही ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासोबतच भास्कराचार्य इनोव्हेटीव्ह सेंटच्या तळमजल्याचे बांधकामासाठी ५ कोटी तर पहिल्या मजल्याच्या उभारणीसाठी ५ कोटी अशा एकुण २० कोटी रुपयांचा विकास कामांना पर्यटन व सांस्कृतिक विभागाने २४ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
पाटणादेवी हे समस्त खान्देशवासियांचे अराध्य दैवत असले तरी, चाळीसगाववासियांचेही जागृत देवस्थान आहे. याक्षेत्राचा धार्मिक व पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा संकल्प केला आहे. काहींनी देवीच्या नावाने राजकारणाचा जोगवा मागितला. गणित नगरीचे इमले रचले. प्रत्यक्षात एक छदामही विकासनिधी ते आणू शकले नाही. गेल्यावर्षी भाविकांची गैरसोय थांबविण्यासाठी स्वखर्चाने डोंगरी नदीवर पूल उभारला. देवीचे महात्म्य दर्शवणारी सजावट मंदिर परिसराला केली. याचे चाळीसगाववासियांसोबतचं राज्यभरातून आलेल्या भाविकांनी स्वागत केले. पाटणादेवी परिसर हा एक सांस्कृतिक व धार्मिक वारसा असून तो जपण्यासाठी नेहमीचं अग्रभागी राहणार आहे. पाटणादेवीच्या पर्यटनविकासासाठी पहिल्या टप्प्यात भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पर्यटन व ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन व भाजपा महायुती सरकारचे जाहीर आभार मानतो असे यावेळी आ.मंगेश चव्हाण म्हणाले.