Breaking
ब्रेकिंग

कासोदा शहर येथे उर्स अतिशय उत्साहात, पारंपरिक पद्धतीने शांततेत संपन्न मुस्लिम बांधवांकडून कासोदा पोलीस प्रशासनाचा सत्कार..!

कासोदा शहर येथे उर्स अतिशय उत्साहात, पारंपरिक पद्धतीने शांततेत संपन्न मुस्लिम बांधवांकडून कासोदा पोलीस प्रशासनाचा सत्कार..!

1 0 3 9 4 2

कासोदा शहरातील  येथील हजरत शादीक शाह बाबा व हजरत बिजली शाह बाबा व मेहरबान शाह बाबा चा उर्स संपूर्ण शहरात अतिशय उत्साहात, पारंपरिक पद्धतीने आणि सलोख्याच्या वातावरणात शांततेत पार पडला.या संपूर्ण सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून

स्थानिक पोलीस कासोदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.उत्सवाच्या काळात चोख पोलिस बंदोबस्त, वाहतुकीचे योग्य नियोजन आणि सर्वधर्मसमभावाची भावना राखल्याबद्दल स्थानिक मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्रीकांत पाटील सर आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस टीम चा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. उर्स सणादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ न देता शांततापूर्ण वातावरणात उत्सव पार पडण्यास पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बिजली शाह बाबा उर्स कमिटीच्या अध्यक्ष राउफ खान मुक्तार खान. उपाध्यक्ष मुस्ताक शेख रजा केबल. साबीर भाई उतरण वाले मेहबूब नेता.मुजाहिद गाजी.शाहरूख मिस्त्री . वाहिद मिस्त्री.शोएब शेख रजा केबल ऑपरेटर.साबीर मुलाजी.सत्यकाम न्यूज उपसंपादक इमरान शेख.

यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सर्वधर्मसमभावाची परंपरा जपत शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस आणि नागरिक सदैव एकत्र राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 3 9 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे