Breaking
ब्रेकिंग

भडगाव शहर येथे बकरीद ईद सण शांततेत आणि उत्साहात साजरा होणार पोलीस प्रशासनाचे शांतता बैठकीत आवाहन..!

भडगाव शहर येथे बकरीद ईद सण शांततेत आणि उत्साहात साजरा होणार पोलीस प्रशासनाचे शांतता बैठकीत आवाहन..!

0 9 9 4 7 7

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव :-भडगाव शहर येथील पोलीस ठाण्याच्या सभागृहात आगामी बकरीद (ईद-उल-अधा) सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे . सण उत्साहात आणि सर्वधर्मीय एकोप्याने पार पाडावा, यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला असून, नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिकारी एकशिंगे साहेब होते, तर व्यासपीठावर विविध समाजांचे प्रतिनिधी, मौलवी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीतील प्रमुख मुद्दे व मार्गदर्शन.!

अफवांवर विश्वास न ठेवणे: सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट पाठवून अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलचे कडक लक्ष असणार आहे. अशा समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

कत्तलीबाबत सक्त मनाई: शासनाच्या नियमानुसार प्रतिबंधित प्राण्यांची कत्तल करण्यास सक्त मनाई आहे. कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.

स्वच्छता आणि आरोग्य: कुर्बानीनंतर निर्माण होणारा कचरा आणि टाकाऊ भाग योग्य ठिकाणीच नष्ट करावा, जेणेकरून शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकामी स्थानिक भडगाव नगरपरिषदेला सहकार्य केले जाईल.या बैठकीस भडगाव नगरपरिष चे Co, मॅडम, भडगाव नगरपरिषदेचे आरोग्य सभापती इम्रान अली सय्यद, हाजी जाकीर कुरेशी, हाफिज युनूस साहेब, पत्रकार हैय्युम सय्यद, सामाजिक कारकर्ते युनूस खान, स्थानिक नेत्यांची सदस्यांची उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नेहमीप्रमाणे शहर व परिसरात सलोख्याचे वातावरण राहील, अशी ग्वाही दिली. शेवटी  बैठकीची सांगता झाली…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 9 4 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे