ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदानातून मानवतेचा संदेश; पारोळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न..!
ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदानातून मानवतेचा संदेश; पारोळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न..!

इमरान शेख उपसंपादक
पारोळा शहरातील ईद-ए-मिलादच्या पवित्र निमित्ताने समस्त पारोळा मुस्लिम समाज व सुन्नी मदिना जामा मस्जिद, पारोळा यांच्या वतीने पीर सैय्यद इमाम बादशाह दर्गा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास भेट देऊन आयोजक व रक्तदात्यांचे मनोबल वाढविण्यात आले.
यावेळी आमदार अमोल दादा पाटील यांनी सदिच्छा भेट देत ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वानिमित्त प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेची ज्योत अधिक प्रज्वलित होवो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
रक्तदान हे केवळ रक्त देणे नसून एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनदान देण्याचे महान कार्य आहे. ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून मानवतेच्या सेवेसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरला.
पारोळ्याची ओळखच हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची आहे. एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होत सुख-दुःखात खंबीरपणे साथ देण्याची परंपरा कायम राहावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या स्तुत्य उपक्रमासाठी समस्त पारोळा मुस्लिम समाज, सुन्नी मदिना जामा मस्जिदचे पदाधिकारी व आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले, तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, जेष्ठ मार्गदर्शक दासभाऊ पाटील, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, शिवसेना मा. शहरप्रमुख बापू मिस्तरी, मा. नगरसेवक अजितदादा मन्सुरी, मा. उपनगराध्यक्ष दिपकभाऊ अनुष्ठान, नगरसेवक नजीरखान बेलदार, नगरसेवक भूषणभाऊ टिपरे, नगरसेवक इमरान शेख यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.



