कासोद्यात श्री संत सेनाजी महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न…!
कासोद्यात श्री संत सेनाजी महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न...!

इमरान शेख उपसंपादक
पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी श्रीराम मंदिर येथे समाजबांधवांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच नृत्य करत संत सेनाजी महाराजांच्या पालखीची मिरवणुकीस श्रीराम मंदिर येथून सुरुवात झाली. बिर्ला चौक, मेन रोड, भाईगल्ली, दक्षिणमुखी हनुमान मंदिर मार्गे पुन्हा बिर्ला चौकातून मिरवणूक श्रीराम मंदिर येथे आणण्यात आली. संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीच्या सांगतेनंतर श्री संत सेनाजी महाराजांच्या पालखीचे व प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी समाजातील महिला, पुरुष तसेच युवकांनी उत्स्फूर्तपणे व स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.
मिरवणुकीनंतर नाभिक समाजाचे कार्यकर्ते सुधीर भिकन सोनवणे यांच्या हस्ते सफत्नीक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. पूजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते समाज बांधवांसह इतर सर्वांनी महाप्रसादाच्या आस्वाद घेतला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद ठाकरे अध्यक्ष, अजय निकम उपाध्यक्ष, गणेश ठाकरे सचिव, राजेंद्र ठाकरे मा. अध्यक्ष, वसंत सोनवणे मा. उपअध्यक्ष, बाळा सोनवणे, जितेंद्र ठाकरे,अशोक ठाकरे, राजेंद्र ठाकरे,सुरेश ठाकरे, विनोद ठाकरे, गोपाल देवरे, समाधान जाधव, सागर ठाकरे, गोपाल निकम, अशोक सोनवणे, धनराज सोनवणे, आबा देवरे, विजय निकम, अमर देवरे, सचिन देवरे, समाधान ठाकरे. इतर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिश्रम घेतले…



