Breaking
ब्रेकिंग

शिंदी गावामध्ये ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेत सुरू असलेले पाणी चोरी व पाणी टंचाई विरोधात आमरण उपोषण सुरू;अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती  व ब्रिक्स मानवाधिकार मिशन ची चौकशीची आक्रमक मागणी..!

शिंदी गावामध्ये ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेत सुरू असलेले पाणी चोरी व पाणी टंचाई विरोधात आमरण उपोषण सुरू;अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती  व ब्रिक्स मानवाधिकार मिशन ची चौकशीची आक्रमक मागणी..!

1 0 0 6 3 6

शिंदी प्रतिनिधी:-लखन गरुड

चालीसगाव तालुक्यातील शिंदी येथे ४ जून २०२६ गुरुवार १०:०० वाजे पासूनआमरण उपोषण सुरु करण्यात आळे येथे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या भ्रष्टाचाराची व आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे तालुका अध्यक्ष नवनाथ मांडे

व तालुका अध्यक्षा ब्रिक्स मानवाधिकार मिशन मनीषा मांडे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणास सुरुवात करण्यात आली

संबंधित अधिकारी यांनी विकासकामांमध्ये मोठा अपहार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. कागदावर दाखवलेली खोटी कामे, निधीचा गैरवापर आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता सुरू असलेला मनमानी कारभार यामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत दोषींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

आमरण उपोषण चे प्रमुख मागण्या ..!

चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावामध्ये ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेत सुरू असलेले पाणी चोरी व पाणी टंचाई विरोधात प्रमुख मागण्याः

१) पाणी चोरी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा.

२) व्हिडिओ पुरावे व कॉल रेकॉर्डच्या आधारे सखोल तपास करावा.

३) इतर संभाव्य पाणी चोरांचा शोध घेऊन कारवाई करावी.

४) प्रकरणातील विलंब व विरोधाभासाबाबत ग्रामसेवक/प्रशासकांची चौकशी करावी.

५) मागील एक वर्षातील उपस्थिती रजिस्टर, हालचाल नोंदी व ग्रामसभा तपासाव्यात.

६) दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी.

 

७) गावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करून सर्वांना समान पाणी मिळेल याची व्यवस्था करावी.

८) ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी निश्चित करावी.

संबधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची  कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.अपहार झालेली रक्कम वसूल करून ती गावात पुन्हा विकासकामांसाठी वापरण्यात यावी.दोषी आढळल्यास तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून पदावरून बडतर्फ

सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात न आल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 0 6 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे