भडगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श; मशिदीत हिंदू बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत….!
भडगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श; मशिदीत हिंदू बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत....!

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद
भडगाव शहरात सामाजिक सलोखा आणि गंगा-जमुनी तहजीब जपणारा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. मेळाव्यात मशिदमध्ये आलेल्या हिंदू बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
उपस्थितांना मशिद परिसराची पाहणी करून देण्यात आली. यावेळी नमाजची पद्धत, मशिदचे स्थापत्य तसेच इस्लाम धर्मातील शांतता, बंधुता आणि मानवतेच्या शिकवणीची माहिती देण्यात आली.
डॉ. सैय्यद रफिक पारनेरकर यांनी मार्गदर्शन करताना विविध समाजघटकांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि सामाजिक ऐक्य वाढविण्याची गरज व्यक्त केली. धार्मिक स्थळे आणि विविध श्रद्धा-परंपरांबाबत असलेले गैरसमज दूर करून एकमेकांच्या श्रद्धांचा आदर करणे हीच सामाजिक एकात्मतेची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाला मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. भडगावची गंगा-जमुनी तहजीब, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची परंपरा अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक सर यांनी केले, तर आभार नगरसेवक इम्रान सय्यद यांनी मानले. शांतता, एकता आणि परस्पर सद्भावनेचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप झाला.



