Breaking
ब्रेकिंग

एरंडोल तालुक्यातील मालखेडे येथे अंजनी नदीला रौद्ररूप; कासोदा-पारोळा महामार्ग ठप्प, नागरिकांमध्ये चिंता…!

एरंडोल तालुक्यातील मालखेडे येथे अंजनी नदीला रौद्ररूप; कासोदा-पारोळा महामार्ग ठप्प, नागरिकांमध्ये चिंता...!

1 0 6 5 1 2

उपसंपादक इमरान शेख

एरंडोल,तालुक्यातील दि. 31 जुलै  गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एरंडोल तालुक्यातील मालखेडे गावातून वाहणाऱ्या अंजनी नदीने आज रौद्ररूप धारण केले आहे नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने नदीकाठच्या शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अंजनी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. सकाळपर्यंत नदी दुथडी भरून वाहू लागली. *मालखेडे गावाजवळील नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने कासोदा-पारोळा महामार्ग ठप्प झाला आहे*. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

दोन्ही गावांचा थेट संपर्क तुटल्याने शाळकरी मुले, रुग्ण आणि दैनंदिन ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. प्रशासनाने नागरिकांना *पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून जाऊ नये* असे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कमी होऊन पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

शेतीचे नुकसान, जीवितहानी नाही..

प्राथमिक माहितीनुसार शेतातील उभे पीक, भाजीपाला आणि काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्रशासन अलर्टवर

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी गायकवाड साहेब, तहसीलदार गोपाळ पाटील, एपीआय श्रीकांत पाटील, सर्कल भाऊसाहेब पारधी, तलाठी संगीता भोसले.यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी *बीट हवालदार अकिल मुजावर, नरेंद्र पाटील, पोलीस पाटील किशोर पाटील, पोलीस पाटील समाधान पाटील, सरपंच सचिन पाटील, माजी सरपंच ईश्वर पाटील, दिपक पाटील, विक्की पाटील, पवन पाटील, अण्णा पाटील, विलास पाटील आणि गावकरी उपस्थित होते.

हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 6 5 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे