कासोदा शहरातील सहवास मतिमंद शाळेत उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप कार्यक्रम.!!!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, कासोदा शहरातील सहवास मतिमंद शाळेत फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात शहरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक ताईसो महानंदा पाटील, तालुका प्रमुख रविंद्र चौधरी, शहरप्रमुख बापूसो समाधान चौधरी, युवासेना शहरप्रमुख जितू भाऊ पहेलवान, उपशहरप्रमुख राहुल भाऊ मराठे, शिवदूत निलेश भाऊ अग्रवाल, उपतालुका संघटक कल्याण भाऊ खैरनार, गुड्डू भाऊ चौधरी, महाले सर, भिकन भाऊ बैरागी, अमोल भोई, स्वप्नील पाटील, भारत चौधरी, विकास पाटील, पितांबर दाभाडे, अतुल दाभाडे, पप्पू घोडके, सागर पाटील, आबा मराठे तसेच इतर अनेक शिवसैनिकांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमात उपस्थितांनी उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत समाजसेवेचा व मानवतेचा आदर्श या माध्यमातून उभा केला. यावेळी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून आनंद व प्रेम व्यक्त करण्यात आले.