जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य बैठक संपन्न..बैठकीत अनुपस्थित अधिकारी यांचे वर कारवाईची मागणी…!
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य बैठक संपन्न..बैठकीत अनुपस्थित अधिकारी यांचे वर कारवाईची मागणी...!

कासोदा ता, एरंडोल प्रतिनिधी
आज दिनांक 18 मार्च रोजी माननीय जिल्हाधिकारी श्री रोहन जी घुगे यांचे अध्यक्षेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व उपस्थित अधिकारी यांचे समवेत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा व निर्णयात्मक बैठक संपन्न झाली.
बैठकीत सुरुवातीस म .जिल्हाधिकारी आदरणीय श्री रोहन जी घुगे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्द सुमनानी स्वागत करीत मंत्रालयीन महत्वपूर्ण व्हिडियो कॉन्फरन्स ची बैठक असल्याने पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याचे सांगत सदरची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चे सचिव निमंत्रक यांचे मार्गदर्शनाखाली होईल असे जाहीर करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव व जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चे अशासकीय सदस्य डॉ.अनिल देशमुख यांनी बैठकीत चर्चात्मक निर्णयासाठी ग्राहक हितार्थ मागण्यांचे निवेदन चा स्विकार करीत बैठकीत कार्यवाही साठी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री महेश चौधरी यांचे कडे सुपूर्द केले.या समयी डॉ. अनिल देशमुख यांचे समवेत निवेदन देते समयी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अमळनेर येथील अशासकीय सदस्य श्री नरेंद्र पाटील उपस्थित होते. या नंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.महेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य यांची बैठकीचे पुढील कामकाज पार पडले.बैठकीत डॉ.अनिल देशमुख अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांनी दिलेल्या निवेदनात समाविष्ट असलेल्या व उपस्थित मान्यवर अशासकीय सदस्य श्री विजय जी मोहरीर ,श्री.महेश जी चावला , साहित्यिक श्री अ. फ .भालेराव , डॉ.सोनगीर ,सौ.सुषमा चव्हाण, ॲड.शिरीन अमेरिवाला , श्री नरेंद्र पाटील, ग्राहक समन्वयक श्री. आदी मान्यवरांनी राज्य परिवहन यांचे तर्फे बस स्थानकावर जबरदस्त उन्हाळ्याचे तडका लक्षात घेता प्रवाशांसाठी पिण्याचे पाण्याची सोय,स्थानकावर पुरेसे कार्यान्वित सी.सी. टी.वी.कॅमेरे , प्रवासी वाहतूक साठी उपलब्ध बसेस यावर तसेच महायुद्ध चे संकेत देणारी परिस्थिती मुळे निर्माण झालेली डिझेल ,पेट्रोल ,गॅस यांची निर्माण झालेली व साठेबाजा कडून निर्माण करण्यात आलेली कृत्रिम टंचाई , घरगुती व व्यावसायिक गॅस रिफिल किमतीत झालेली वाढ , रिफिल वजन मापिका व सुस्थितीत असणारी रिफिल्स,जागतिक व राष्ट्रीय ग्राहक दिन अधिक लोकाभिमुख होणे संबंधी घ्यावयाची दखल , वैद्यकीय सेवेत खाजगी हॉस्पिटल द्वारे रुग्णांना आकारण्यात येणारी बिले ,वैद्यकीय विमा कंपनी द्वारे जुजबी करणे देत नाकारण्यात येत असलेली देयके , खाजगी बसेस ची एन सन वारीत प्रवासी भाड्यात होणारी लूट ,तांदूळ , गहू ,दूध व दुग्धजन्य पदार्थान मधील अन्न भेसळ , जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ची मासिक सभा घेण्या संबंधी व बैठकीत उपस्थित मुद्द्यांचे निराकरणासाठी केलेली अनुपालन कारवाई प्रत्येक सदस्यांना कळविण्यात येणे संबंधीची आदी उपस्थित मागण्यांवर सर्व मान्यवरांनी चर्चेत महत्वपूर्ण सहभाग नोंदविला. त्यावर अत्यंत सक्रिय दृष्टिकोन ठेवीत उपस्थित जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री चौधरी ,अन्न विभाग अधिकारी ,रेल्वे प्रशासन अधिकारी संजय जाधव ,परिवहन खात्याचे निरीक्षक अधिकारी ,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री रुपेश बिजेवार , सहाय्यक अमर जी आमटे आदी उपस्थित अधिकारी वर्गाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांची सकारात्मक भूमिकेत येत मागण्या मान्य करीत कारवाई करण्यात येण्याचे संकेत बैठकीत व्यक्त केलेत.सदरचे बैठकीत सन 1997 ,98 पर्यंत कार्यान्वित असणाऱ्या अन्न भेसळ व विषबाधा प्रतिबंधक तालुका स्तरीय समित्या पुनर्रचित करण्यात याव्यात म .प्रांत अधिकारी व तहसीलदार यांचे अधिपत्याखाली त्यात सेवा भावी संस्थांचे प्रतिनिधी ,ग्राहक संरक्षण परिषद सदस्य व ग्राहक पंचायत संघटनात्मक प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा अशी डॉ.अनिल देशमुख यांनी केलेली मागणीस सर्व उपस्थिती अशासकीय सदस्य यांनी एकमुखी मान्यता देत यावर व सभेत अनुपस्थित असलेले महावितरण कंपनी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वजन माप निरीक्षक विभागाचे ,एस टी .राज्य परिवहन खात्याचे व आदी अनुपस्थित अधिकारी यांचेवर सत्वर कारवाई करण्यात यावी करणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी म्हणून एक मुखी मागणी करण्यात आली आहे.यावर जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सचिव यांनी अनुपस्थित विभागाचे अधिकारी यांचे कडून नोटीस द्वारे खुलासा मागवण्यात येईल तसेच बैठकीत उपस्थित मागण्यांवर संबंधित विभागाने त्वरीत कारवाई करण्या साठी आदेशात्मक सूचना जारी करण्यात येईल असे जाहीर केले. बैठकीत मा.जिल्हा पुरवठा अधिकारी श्री महेश चौधरी यांचे हस्ते सर्व मान्यवर अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांना सदस्य असल्याचे शासकीय ओळख पत्र देत सन्मानित करण्यात आले.बैठकीचे शेवटी उपस्थित मान्यवर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चे सर्व अशासकीय सदस्य यांचे व विभाग प्रतिनिधी व अधिकारी यांचे जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी श्री रुपेबिजेवार यांनी आभार व्यक्त करीत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री महेश चौधरी यांचे परवानगीने सभा संपन्न झाली असल्याचे जाहीर केले.



