Breaking
ब्रेकिंग

कासोद्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळांमधील शिक्षक पदे भरा – सामाजिक कार्यकर्त्यांची आमदार ॲड अमोल दादा पाटील यांच्याकडे मागणी…!

कासोद्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळांमधील शिक्षक पदे भरा - सामाजिक कार्यकर्त्यांची आमदार ॲड अमोल दादा पाटील यांच्याकडे मागणी...!

1 0 9 1 4 8

इमरान शेख उपसंपादक

कासोदा शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळांमधील शिक्षकांच्या मोठ्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती आणि समाजसेवी व ग्रामस्थ कासोदा यांनी आज दि 16ऑगस्ट रोजी

एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आमोल दादा पाटील यांना निवेदन दिले.आहे

निवेदनात म्हटले आहे की, कासोदा येथील 4 जिल्हा परिषद उर्दू शाळांमध्ये एकूण 781 विद्यार्थी आहेत. मात्र प्रत्येक शाळेत केवळ 4 ते 5 शिक्षक आहेत आणि प्रत्येकी 4 पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा निर्माण होत आहे. मागील भरतीत कासोदा गावाला फक्त एका शिक्षकाची नियुक्ती झाली होती.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते   झुलाफिकर अली सय्यद, बिलाल काझी आणि इमरान मुजावर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली की, पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत कासोदा शहरातील उर्दू शाळांना प्राधान्य देऊन रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल.

शाळा व्यवस्थापन समिती आणि समाजसेवकांनी आमदार ॲड अमोल दादा पाटील यांचे कडे सकारात्मक निर्णय घेऊन सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 9 1 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे