हिंगोलीचे सुपुत्र सलीम शेख यांची एसआरपीएफमध्ये निवड; सत्कार समारंभा उत्साहात संपन्न…!
हिंगोलीचे सुपुत्र सलीम शेख यांची एसआरपीएफमध्ये निवड; सत्कार समारंभा उत्साहात संपन्न...!

सत्यकाम न्यूज नेटवर्क :- हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हिंगोली येथील रहिवासी सलीम शेख यांची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे. या घवघवीत यशाबद्दल
हिंगोली येथे त्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात व जल्लोषात आयोजित करण्यात आला होता.या सत्कार समारंभास शहरातील मस्तान शहा नगरला येथे त्याना
पुष्पगुच्छ, शाल देऊन सलीम झुफिकर शेख यांचा गौरव करण्यात आला.आपल्या सत्काराला उत्तर देताना सलीम शेख यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबीयांचे सहकार्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले.
मस्तान शहा नगर भागातील तरुणांनी कोणत्याही कठीण परिस्थितीला न घाबरता ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते,
असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. त्यांच्या या प्रेरणादायी यशामुळे हिंगोली जिल्ह्यातील युवा वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्या वेळी उपस्थित बाबा शेख.अमु शेख.सलीम शेख. शहीद शेख. मेहबूब शेख. इलियास शेख. समीर शेख. रहीम भाई होते


