भडगाव येथे नगरसेवक सय्यद इमरान अली यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न…!
भडगाव येथे नगरसेवक सय्यद इमरान अली यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न...!

भडगाव प्रतिनिधी :-इमरान शेख उपसंपादक
भडगाव शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी नगरसेवक तथा स्वच्छता व आरोग्य सभापती सय्यद इमरान अली शहादत अली सय्यद यांच्या ‘संपर्क कार्यालयाचा’ भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री. किशोर धनसिंग पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी सदस्य सय्यद मोहब्बत अली शहादत अली उपस्थित होते. कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेखाताई जहांगीर महाले, उपनगराध्यक्ष श्री. राजेंद्र महादू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. जिभाऊ पाटील यांसह भडगाव नगरपरिषदेचे विविध सभापती आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ:- हाजी अय्युब खान गुलजार खान चौक, जि.प. उर्दू बॉईज केंद्र शाळेसमोर असलेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामे आणि सरकारी योजनांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सय्यद इमरान अली यांच्या जनसेवा कार्याचे कौतुक केले.या सोहळ्याला ‘मेरा गांव मेरा देश’ ग्रुपचे सदस्य, पत्रकार बंधू आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद इमरान अली युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



