दिव्यांग बांधवांसाठी यूडीआयडी (UDID) कार्ड नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन…!
दिव्यांग बांधवांसाठी यूडीआयडी (UDID) कार्ड नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन...!

एरंडोल तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविण्यात आव्हान.दिव्यांग बांधवांसाठी यूडीआयडी (UDID) कार्ड नोंदणी विशेष शिबिराचे तहसिल कार्यालय, एरंडोल यांचेमार्फत दि. १८ जून, २०२६ रोजी सकाळी ठिक १०.० वाजता श्री स्वामी समर्थ केंद्र, रामचंद्र नगर, एरंडोल, बस स्टॅण्डचे पाठीमागे.
दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचेकडील शासन निर्णय, दि. १५ मे, २०२६ मध्ये दिलेल्या सुचनांप्रमाणे तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आव्हान करणेत येते की, सर्व दिव्यांगांना ज्यांच्याकडे जुन्या प्रकारचे, सक्षम प्राधिका-याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र / SADM प्रमाणपत्र आहे, अशा सर्व दिव्यांगाना दि. ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) काढून घेणेत यावे. यासाठी मा उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांचे अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या तिस-या गुरुवारी शिबीरे व कार्यशाळा घेणेबाबत नमुद केले आहे. त्यानुसार, माहे जुन, २०२६ मधील तिसरा गुरुवार, दि. १८/०६/२०२६ रोजी सकाळी ठिक १०.० वाजता श्री स्वामी समर्थ केंद्र, रामचंद्र नगर, एरंडोल, बस स्टॅण्डचे पाठीमागे या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. तरी या कार्यशाळेस सर्व दिव्यांग बांधवांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविण्यात येऊन ज्यांनी वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) काढलेलं नाही, त्यांनी वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) काढण्यासाठी नोंदणी करावी, असे आव्हान मा श्री. मनीषकुमार गायकवाड, उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल, श्री. गोपाळ पाटील, तहसीलदार, एरंडोल यांचेमार्फत करणेत येत आहे.
गोपाळ पाटील
तहसीलदार, एरंडोल



