पाचोरा येथे 1500 वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा*
पाचोरा येथे 1500 वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा*

प्रतिनिधी :- जैनुल शेख
पाचोरा येथे रविवार रोजी 1500 वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता सर्व मुस्लिम बांधव नूर मशीद आठवडे बाजार पाचोरा येथे जमा झाले. येथून जुलूस ची सुरुवात झाली. लोकांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर दरुदो सलाम पठण करून मिरवणूक काढली.आठवडे बाजार, हुंसैनी चौक,पिंजरवाडा, देशमुख वाडी, नगरपालिका,आंबेडकर चौक,शिवाजी महाराज चौक, मुल्ला वाडा,सोनार गल्ली असा मिरवणूकच्या मार्ग होता नंतर नूर मशीद येथे मिरवणूक संपली. जुलूस मध्ये लहान मुलापासून,तरुण, वयोवृद्ध, सर्व प्रकारचे लोक,उत्साहाने हजर होते. मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 वा मिलाद असल्याने वेगळ्या पद्धतीने व उत्साहाने ईद मिलादुन्नबी साजरा करण्यात आली.मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील,आजी-माजी आमदार,शहरातील प्रसिद्ध राजकीय लोक शिवाजी महाराज चौक येथे पोहोचले. जुलूसचे शेवटी नूर मशीद आठवडे बाजार येथे दुआ (प्रार्थना कार्यक्रम) व सत्कार समारंभाच्या आयोजन करण्यात आलेला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तालुक्याचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील साहेब हे होते.यावेळी किशोर आप्पा पाटील यांनी कार्यक्रम मध्ये उपस्थित सर्व मौलवी साहेबांचे फुल व शॉल देऊन सत्कार केले. कार्यक्रमची प्रस्तावना शेख जावेद रहीम यांनी मांडली.नूर मशिदचे खती ब व ईमाम जिशान रजा यांनी मिलादुन्नबी साजरा करण्यामागे उद्दिष्ट काय? मोहम्मद पैगंबर यांनी सर्व मानवतासाठी,प्रेम,बंधुत्व, एकता च्या संदेश आणलेला आहे अशी माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात किशोर आप्पा पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिलादुन्नबीची शुभेच्छा दिली. त्यांनी सांगितले की मी माझे कार्यकाल मध्ये जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे,पुढेही नक्की करणारच.माझ्या कार्यकाल मध्ये कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही, घडणार नाही असे त्यांनी आव्हान केले. सर्व धर्मातील लोकांनी,एकमेकांशी संपर्क साधावा,एकमेकांचे सन साजरा मध्ये हजेरी लावावी, जातीय सलोखा कायम ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रमाची समाप्ती दरुदव सलाम व दुवावर (प्रार्थना)झाली. कार्यक्रम मध्ये मोठी संख्या मध्ये हिंदू मुस्लिम समाजातील लोक उपस्थित होते. त्यांनी एकमेकांशी गले मिळून शुभेच्छा दिली. यावेळी मौलाना जीशान रजा, नईम रजा,परवेज आलम, इकराम रजा,मौलाना इकबाल,मौलाना ताहीर,अरशद रजा,विजय ठाकूर,संजय गोइल, पाचोरा पोलीस निरीक्षक, अबुलेस सेठ,मेहमूद मुतवलली,जहांगीर पिंजारी,वहाब बागवान,जाकीर खाटीक,सलाम इब्राहिम,उस्मान खाटीक,शरीफ बेकरीवाले,जॅकी खाटीक,फिरोज खान,सलीम मणियार, अफजल मणियार आदी मान्यवर उपस्थित होते.