Breaking
ब्रेकिंग

प्रहार अपंग कार्यकारी संघटना तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांच्या तक्रारीचा दणका! एरंडोल एसटी डेपोचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी यांची अखेर बदली…!

प्रहार अपंग कार्यकारी संघटना तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांच्या तक्रारीचा दणका! एरंडोल एसटी डेपोचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी यांची अखेर बदली...!

1 1 1 2 8 7

इमरान शेख

उप-हेडलाईन – रा.प. मध्यवर्ती कार्यालयाने घेतली गंभीर दखल, पाचोरा आगारात उचलबांगडी

एरंडोल – एरंडोल आगारात सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री. मनोज अरुण तिवारी यांची अखेर बदली करण्यात आली आहे. प्रहार अपंग कार्यकारी संघटना पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. योगेश लोटन चौधरी यांनी केलेल्या लेखी तक्रार अर्जाची रा.प. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने गंभीर दखल घेतल्याने ही कारवाई झाली आहे.

प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांनी मनोज तिवारी यांच्या गैरकारभाराबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य शहानिशा करून नियमाधीन कार्यवाही करण्यात आल्याचे रा.प. प्रशासनाने कळवले आहे.

याबाबत प्रादेशिक व्यवस्थापक सनियंत्रण समिती क्र. 6, रा.प. नाशिक प्रदेश, नाशिक येथील श्री. विजय न. गिते यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे.

विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, जळगाव विभाग यांचे पत्र जा.क्र. राप/विनिज/प्रशा/स्टेनो/2026/6572 दि. 13.08.2026 आणि प्रादेशिक आस्थापना आदेश क्र. 52 [नि.स.क्र.6.] / सन 2026 दि. 21.08.2026 अन्वये श्री. मनोज अरुण तिवारी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, रा.प. एरंडोल आगार यांची बदली रा.प. पाचोरा आगार येथे करण्यात आली आहे.

यापूर्वीच त्यांना एरंडोल आगारातून कार्यमुक्तही करण्यात आले आहे. (जा.क्र/आव्यप्र/प्रशा/वाह/का.म/1109 दि. 05/09/2026)

योगेश चौधरी यांनी मानले आभार –

तक्रारीची योग्य ती दखल घेऊन न्याय दिल्याबद्दल प्रहार अपंग कार्यकारी संघटना तालुकाध्यक्ष योगेश लोटन चौधरी (कासोदा) यांनी रा.प. महामंडळाचे, विभाग नियंत्रक जळगाव आणि प्रादेशिक व्यवस्थापक नाशिक यांचे आभार व्यक्त केले आहेत.

एसटी महामंडळ ही गोरगरिबांची, सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. तिथे जर एखादा अधिकारी हुकूमशाही पद्धतीने वागत असेल तर प्रहार अपंग कार्यकारी संघटना कधीच गप्प बसणार नाही. मी फक्त कर्मचारी आणि प्रवाशांच्या न्यायासाठी लढलो. माझ्या तक्रारीची दखल घेऊन रा.प. प्रशासनाने योग्य तो न्याय दिला. त्याबद्दल मी विभाग नियंत्रक जळगाव, प्रादेशिक व्यवस्थापक नाशिक आणि मध्यवर्ती कार्यालयाचे आभार मानतो.” – योगेश लोटन चौधरी, तालुकाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांतिकारी संघटना पक्ष, एरंडोल (कासोदा)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 1 2 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे