छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाड्यात दिव्यांग दिन म्हणून विशेष कार्यक्रम..
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाड्यात दिव्यांग दिन म्हणून विशेष कार्यक्रम..

प्रतिनिधी :- जैनुल शेख उत्राण
एरंडोल तालुक्याती मौजे वनकोटा,येथे एक दिवस दिव्यांगासाठी उपक्र दि. २४ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाड्यात दिव्यांग दिन म्हणून मौजे वनकोटा, येथील सहवास प्रौढ मतिमंद मुलांची निवासी पुनर्वसन संस्था येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
अधिकाऱ्यांची कार्यवाही
१)श्री. अमोल बन, नायब तहसिलदार (संजय गांधी योजना) – संस्थेला पूर्वभेट देऊन विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली व आवश्यक मदतीची नोंद केली.
२)मा. मनीष गायकवाड, उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग – कार्यशाळेचे मार्गदर्शन व अध्यक्षस्थानी उपस्थित राहून दिव्यांग विद्यार्थ्यांना योजनांशी जोडण्यास प्रोत्साहन दिले.
३)मा. प्रदीप पाटील, तहसिलदार, एरंडोल – लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही सुनिश्चित केली.
४)तालुका वैद्यकीय अधिकारी व पथक – सर्व ३४ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार दिले.
मुख्य निष्कर्ष:
•संस्थेतील ३४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ विद्यार्थ्यांना योजना लाभ मिळत असून २९ विद्यार्थ्यांना अर्ज भरून देण्यात आले.
•जिल्ह्याबाहेरील व तालुक्याबाहेरील विद्यार्थ्यांचेही अर्ज भरून संबंधित तहसिल कार्यालयाकडे सादर केले गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक श्री. सावंत यांनी शासनाच्या उपक्रमाचे स्वागत करून प्रशासनाचे आभार मानले.
या उपक्रमास जिल्हाधिकारी, जळगाव यांचे मार्गदर्शन लाभले असून, महसूल विभागातील अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी अयाज शेख, श्री,विजय कोडी, महसूल सहाय्यक ,श्री विशाल सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, व स्थानिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.