Breaking
ब्रेकिंग

अवैध दारू भट्टीवर कासोदा पोलिसांची धडक कारवाई..!

अवैध दारू भट्टीवर कासोदा पोलिसांची धडक कारवाई..!

0 9 3 6 8 8

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील निपाणे गावातील अवैध दारूभट्ट्यांवर पोलिसांची मोठी धाड; हजरो रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त,

कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निपाणे परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या भट्ट्यांवर पोलिसांनी अचानक धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायने, महुआ लहान आणि तयार दारू असा एकूण ५०.०००हजार रुपये अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो जागीच नष्ट केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कासोदा पोलीस स्टेशन या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरक्षक यांची विशेष पथकाने  ही कारवाई केली. या धाडसत्रात हातभट्टीसाठी वापरले जाणारे ड्रम, भट्ट्या आणि साहित्याला आगीच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी काहींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कासोदा पोलीसांकडुन गा.ह.भ.ची दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळ, नवसागर, पाणी मिश्रीत कच्चे रसायन बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई, हजारोंचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केले बाबत…

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील निपाणे गावातील परीसरात दिनांक २४/०२/२०२६ रोजी भट्या नाल्याकाठी तसेच चौक्या नाल्याकाठी गा.ह.भ.ची दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळ, नवसागर, पाणी मिश्रीत कच्चे रसायन बाळगत असलेबाबत सपोनि. श्रीकांत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने पोस्टे हद्दीत दि. २४/०२/२०२६ रोजी श्रेणी पोउनि. रामकृष्ण पाटील, पोहेकॉ/२६८९ नितीन सुर्यवंशी, पोकों/२११२ योगेश पाटील, पोकों/२०२१ लहु हटकर अशांना रवाना केले. बातमी प्रमाणे निपाणे शिवारातील भट्या नाल्याकाठी नारायण वना भिल रा.निपाणे ता. एरंडोल व चौक्या नाल्याकाठी तानकु गुलाब भिल रा.निपाणे ता. एरंडोल असे एकुण प्लॅस्टीकचे २० ड्रम, ५० लिटर मापाचे त्यामध्ये गुळ, नवसागर, पाणी मिश्रीत कच्चे रसायनने भरलेल्या ड्रम मध्ये लाकडी काठीच्या सहाय्याने ढवळाढवळ करतांना मिळुन आले. त्यांच्या ताब्यात एकुण ५०,०००/- रु. किंमतीचे १००० लिटर कच्चे रसायन मिळुन आल्याने ते जागीच नाश केला तसेच आरोपींतावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक . डॉ महेश रेड्डी  यांच्या आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधिक्षक  कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी. विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सपोनि. श्रीकांत पाटील, श्रेणी पोउनि. रामकृष्ण पाटील, पोहेकॉ/२६८९ नितीन सुर्यवंशी, पोकॉ/२११२ योगेश पाटील, पोकॉ/२०२१ लहु हटकर अशांनी केली असुन पुढील तपास श्रेणी पोउनि. रामकृष्ण पाटील हे सपोनि. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 3 6 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे