Breaking
ब्रेकिंग

मोतीबिंदू मुक्त मतदारसंघ” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार आमदार. ॲड. अमोलदादा पाटील..!

मोतीबिंदू मुक्त मतदारसंघ” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार आमदार. ॲड. अमोलदादा पाटील..!

0 9 7 2 0 0

पारोळा – जनतेच्या आरोग्याची काळजी घेत लोकहितार्थ आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आज आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या प्रेरणेतून व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे भव्य उद्घाटन पारोळा येथील आमदारांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीषभाऊ पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शेतकी संघाचे मा. उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, मा. संचालक राजेंद्र पाटील, धर्मा पाटील (टोळी), नगरसेवक मनोजभाऊ पाटील, उपगटनेते पंकज मराठे, बापू मिस्तरी, विवेक पाटील, भूषण टिपरे, नजीरखान बेलदार, इमरान शेख यांच्यासह अनेक मान्यवर, कांताई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार मा. अमोलदादा पाटील म्हणाले की,

मोतीबिंदू मुक्त मतदारसंघ’ ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात साकार करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. ग्रामीण व शहरी भागातील गोर-गरीब, गरजू व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा पूर्णतः विनामूल्य मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

अनेक नागरिकांना डोळ्यांच्या आजारांबाबत वेळेवर उपचार मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. अशा रुग्णांना योग्य वेळी तपासणी, निदान आणि आवश्यक असल्यास मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी देण्याचा हा एक प्रामाणिक आणि लोकहिताचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

सेवा हीच खरी श्रद्धा” या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अनेकांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे, हा आनंद व्यक्त करत त्यांनी सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, सदस्य आणि शिवसैनिक बांधवांचे तसेच कांताई नेत्रालयचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या माध्यमातून गावागावांत माहिती पोहोचवून मोठ्या प्रमाणात रुग्णांना या शिबिरात सहभागी करून घेण्यात आले.

चला, एकत्र येऊया…

मोतीबिंदू मुक्त मतदारसंघ” घडवण्यासाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात नवदृष्टी देण्यासाठी या सामाजिक कार्यात आपला हातभार लावूया!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 7 2 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे