
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – तालुक्यातील हिरापुर रोडवरील तांबोळे फाट्यावरील अँचिवर्स पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच शाळेच्या प्रांगणात झाले गीत नृत्य व नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलातरंग सादरीकरण केले. या स्नेहसंमेलनात चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष शरद पाटील व सचिव पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध, झाडे वाचवा झाडे जगवा, नारी शक्ती हीच महान शक्ति, हिंदू-मुस्लीम एकता, राष्ट्रीय एकात्मता, शेती व शेतकरी मराठी व हिंदी चित्रपट गिते आदी विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सादरीकरण केले सुमारे ३०० हुन अधिक विद्यार्थीनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
या कार्यक्रमासाठी अँचिवर्स पालक स्कुलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनाला मोहसीन शेख, मतिन सर व सागर सर यांचे मार्गदर्शन लाभले.