Breaking
ब्रेकिंग

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एरंडोल तहसील कार्यालयात आढावा बैठक….

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एरंडोल तहसील कार्यालयात आढावा बैठक....

1 1 2 9 9 4

इमरान शेख उपसंपादक डिजिटल मीडिया

एरंडोल/ एरंडोल, दि. 24 राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल, पारोळा आणि भडगाव परिसराचा आढावा घेण्यासाठी आज एरंडोल तहसील कार्यालयात आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

सोयाबीन, मका, कापूस, ज्वारी, भात आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी ही बैठक घेण्यात आली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश –

कोणत्याही पात्र शेतकऱ्याचा पंचनामा तांत्रिक कारणामुळे राहता कामा नये. ई-पीक पाहणी नाही, नेटवर्क नाही हे कारण चालणार नाही, प्रत्यक्ष पाहणी करा.

४८ तासात गावनिहाय प्राथमिक अहवाल आणि संयुक्त पंचनामे पूर्ण करा.

पुढील १५, ३० आणि ६० दिवसांचा पाणीपुरवठा आराखडा तयार करा, टंचाई गावांची यादी तयार ठेवा.

चारा डेपो, पशु पाणी आणि मनरेगातून जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करा.

– पीक विमा दावे, कृषी पंपांचा वीजपुरवठा आणि नादुरुस्त रोहित्रे तातडीने सुरू करा.

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष गावपातळीवर पोहोचून युद्धपातळीवर काम करावे, यासाठी आजच्या बैठकीत ठोस दिशा निश्चित करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड साहेब, तहसीलदार गोपाल पाटील साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महसूल, कृषी, पाणीपुरवठा, वीज, सहकार आदी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे