शेतकरी शेतमजुर हक्क यात्रा कासोदा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांची दणदणीत जाहीर सभा…
शेतकरी शेतमजुर हक्क यात्रा कासोदा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांची दणदणीत जाहीर सभा...

कासोदा प्रतिनिधी :-
एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे बिर्ला चौकात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांची दणदणीत जाहीर सभा घेण्यात आली याप्रसंगी बच्चू कडूंनी महाराष्ट्र शासन केंद्र सरकारवर जोरदार फटकेबाजी करत सभा चांगलीच गाजवली सभेत त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की
पक्षाचे झेंडे व समाज बाजूला ठेवून फक्त शेतकरी असल्याचे डोक्यात ठेवत शेतकऱ्यांचा आंदोलनात २८ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन येथील शेतकरी संवाद सभेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाध्यक्ष बच्चू कडू यांनी केले.
राज्य सरकार व केंद्र सरकारवर सरकडून टिका करतांना त्यांनी पंजाब राज्यातील शेतकऱ्यांकडून जो लढा दिला त्या लढ्याला यश आले ते फक्त शेतकऱ्यांच्या एकजुटीने त्या प्रमाणेच आपण एकजुटीने आंदोलन केल्यास शेती मालाला योग्य भाव मिळेल. आमदारांच्या पगारवाढीला विरोध फक्त मीच केल्याचे त्यांनी म्हटले तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी देखील पक्ष व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री असूनदेखील कासोद्यात पंधरा दिवसात पाणी पुरवठा होत आहे हे खेदाची बाब आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी तीन वेळेस केले असल्याचे आवर्जून सांगितले तरी या गावाला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तसेच कापूस, सोयाबीन, मक्याला भाव मिळत नसल्याने गुलाबराव पाटलांनी आता गुलाबाची शेती करावी. असाही टोला त्यांनी आपल्या भाषणात लगावला. त्यानंतर शहरातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी १७५ लिटर आणि ग्रामीण भागातील लोकांना ४५ लिटर पाणी त्याचप्रमाणे शहरातील लोकांना अडीच लाख रुपये घरकुलाला दिली जातात आणि ग्रामीण भागात फक्त सव्वा लाख दिला जातो असा भेदभाव शासन का म्हणून करतो ते असा भेदभाव न करता सरसकट सर्व गोष्टींची वाटप झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले
याप्रसंगी एडवोकेट विश्वास भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासह वसाकाच्या प्रश्न उपस्थित करून बच्चू कडूंचे लक्ष वेधून घेतले. तसेच याप्रसंगी सभेत प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लू जवंनजाळ, जळगाव संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर आदींची भाषणे झाली. शेवटचे भाषण जळगाव लोकसभेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांचे झाले त्यांनी आपल्या भाषणात २८ ऑक्टोबरला कासोदा आणि जळगाव जिल्हा सह अनेक शेतकरी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहतील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरकांडे चे राजेंद्र ठाकरे यांनी केले तर आभार प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील उमरेकर यांनी केले याप्रसंगी पोलीस बंदोबस्त फार मोठ्या प्रमाणात लावलेला होता.