अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कासोदा पोलिसांचा छापा; १२०० लिटर रसायन व साहित्य नष्ट..!
अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कासोदा पोलिसांचा छापा; १२०० लिटर रसायन व साहित्य नष्ट..!

कासोदा पोलीस स्टेशनचे परिसरातील सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १२०० लिटर कच्चे रसायन, तयार दारू आणि निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले आहे.
सविस्तर वृत्त:
कारवाईचा तपशील: कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती विरोधात कासोदा पोलिसांनी कारवाई करुन मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, साहित्य व तयार दारू नष्ट केले.
आज दिनांक-11/04/2026 रोजी पहाटेच्या सुमारास ताडे, आडगाव, निपाणे व नांदखुदं बु. या गावांच्या शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारु अड्ड्यांवर कासोदा पोलिसांनी नियोजनबद्ध छपे टाकुन, हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन तसेच तयार दारू जप्त करून एकूण 1200 लिटर रसायन, त्यार दारू तसेच दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य घटनास्थळीच नाश करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹60,000/- इतकी असुन केलेल्या कारवाईतुन कासोदा पोलीस स्टेशन येथे अवैध दारु सदर्भात 04 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही व्यापक कारवाई मा. पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव विभाग श्रीमती कविता नेरकर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकुर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली राबविण्यत्त आली.
कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अभिकारी सपोनि श्रीकांत पाटील यांनी विशेष नियोजन करत चार स्वतंत्र पथके गठीत केली होती. या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी समन्तय साधत एकाच वेळी छापे टाकून गानठी हातभट्ट्ठा उद्भवस्त केल्या. या धडक कारवाईत ग्रेड पोउनि/रामकृष्ण पाटील, पोहेका नंदलाल परदेशी, पोहेक/किरण गाडीलोहार, पोना/अकिल मुजावर, पोकों/योगेश पाटील, पोकों/लह हटकर पोकों/कुणाल देवरे च पोकों/सोनु पाचुंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत नोहिम यशस्वी केलं…



