Breaking
ब्रेकिंग

चाळीसगाव मतदारसंघाचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले..

चाळीसगाव मतदारसंघाचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले..

0 9 2 5 6 3

चाळीसगाव तालुका प्रतिनिधी :- कलीम सैय्यद

चाळीसगाव : चाळीसगाव मतदारसंघाचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव दादा देशमुख यांच्या अकस्मात निधन अत्यंत दुःखद बातमी

चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजीव देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते चाळीसगावचे शिल्पकार म्हणून विख्यात असलेले लोकनेते कै. अनिलन देशमुख यांचे चिरंजीव होत. त्यांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली ते आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. यानंतर २००९ साली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून गेले.यानंतर त्यांना दोन वेळेस विधानसभेत पराभव पत्करावा लागला. गेल्या काही वर्षांपासून त्यांना प्रकृती अस्वास्थाचा त्रास होत होता. यातच ऐन दिवाळीच्या काळात हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले.

पांडुरंग परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

राजीव देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील एक मान्यवर काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 5 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे