Breaking
ब्रेकिंग

कासोद्यात ज्ञानयज्ञाची १५ वर्षे; ओम साईराम शासकीय कर्मचारी ग्रुपचा आदर्श उपक्रम…!

कासोद्यात ज्ञानयज्ञाची १५ वर्षे; ओम साईराम शासकीय कर्मचारी ग्रुपचा आदर्श उपक्रम...!

1 1 3 3 7 6

सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क कासोदा

सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क कासोदा

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी आणि सामान्य ज्ञानाची आवड वाढावी या उदात्त हेतूने कासोदा येथील ‘ओम साईराम शासकीय कर्मचारी ग्रुप’ गेल्या तब्बल १५ वर्षांपासून सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करीत आहे. शासकीय सेवेत असूनही समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून स्वखर्चातून राबविला जाणारा हा उपक्रम आज संपूर्ण परिसरासाठी आदर्श ठरला आहे.

यंदाच्या परीक्षेचा बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा दि. २८ सप्टेंबर रोजी कासोदा येथील भारती विद्या मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

स्वखर्चातून समाजसेवा हे वेगळेपण

या ग्रुपचे सर्व सदस्य वर्षभर शासकीय कर्तव्य बजावत असतात, तरीही या परीक्षेसाठी आवर्जून वेळ काढतात. विशेष म्हणजे परीक्षेचे आयोजन, प्रश्नपत्रिका तयार करणे, बक्षिसे, प्रमाणपत्र यासाठी लागणारा संपूर्ण खर्च सदस्य आपल्या पगारातून स्वखर्चाने करतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता १५ वर्षे अविरत सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पांडुरंग अण्णा पाटील होते. प्रमुख वक्ते जयदीप पाटील यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विषद केले. प्रमुख पाहुणे म्हणून IRS अधिकारी प्रितेश बाविस्कर, राजेंद्र पाटील खडके आणि API श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कृषी पंडित प्रवीण पाटील, मनोहर पाटील बाहूटे, भास्कर चौधरी, नंदू खैरनार, पंचमंडळ, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेंद्र ठाकरे यांनी केले. कृषी भूषण समाधान पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकर चौधरी, तुषार चौधरी, राहुल सोनवणे, योगेश चव्हाण, अरुण चौधरी, प्रवीण चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, अक्षय शिंपी, योगेश तांदळे, सतीश गढरी, स्वप्नील चौधरी, राहुल पवार व दिनेश पाटील यांनी परिश्रम घेतले. आभार राहुल सोनवणे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 3 3 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे