कासोदा येथे महाशिवरात्रीनिमित्त १३१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात आठ महिलांनी देखील रक्तदान केले…!
कासोदा येथे महाशिवरात्रीनिमित्त १३१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात आठ महिलांनी देखील रक्तदान केले...!

महाशिवरात्रीनिमित्त आज देशभरातील शिवालयांमध्ये “हर हर महादेव”च्या जयघोषासह भक्तीमय उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच भक्तांनी भगवान शंकराच्या दर्शनासाठी व जलाभिषेकासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. पूजा, अभिषेक आणि उपवासाने महाशिवरात्री साजरी केली जात आहे.
महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर आज देशभरातील शिवालयांमध्ये भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. पहाटेपासूनच “हर हर महादेव” आणि “ओम नमः शिवाय”च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले असून, भाविकांनी महादेवाचे दर्शन घेऊन उपवास व विशेष पूजा-अर्चा केली।
एरंडोल तालुक्यातील कासोदा.येथे महाशिवरात्रीनिमित्त भडगाव एरंडोल रोडावरील श्री महेश मंदिरा येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी सकाळी काकड आरती होऊन देखील बारा क्विंटल साबुदाण्याचा फराळ व चहा वाटप करण्यात आले कासोदा येथील जयभोले गृपतर्फे दिवसभर फराळ व चहा वाटप करण्यात आले होतो . या ठिकाणी इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जय भोले ग्रुप तर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षी १३१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात आठ महिलांनी देखील रक्तदान केले. हे या कार्यक्रमातील विशेष म्हणावे लागेल रक्तदान शिबिरात इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांनी रक्त संकलन केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याचा जयभोले गृपतर्फे गौरवपत्र व ट्रॉफी देत सन्मान करण्यात आला. तसेच महाशिवरात्रीनिमित्त मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर येथील सुधाकर नगर येथील पंचवटी मंदिरात देखील यावर्षी साबुदाणा व फळ वाटप करण्यात आले. तर शिवाजी नगर येथील पंचप्राणेश्वर मंदिरात तीन दिवस किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला तर आज पहाटे भस्म अभिषेक करून काकड आरती करण्यात आली. तसेच रामनगर मधील महादेव मारुती मंदिरात फराळाचे वाटप करण्यात आले .
तसेच आठवडे बाजारातील नर्मदेश्वर महादेव मंदीरातही फराळ वाटप करण्यात आले. आणि ओम शांती केंद्रात देखिल महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.या सर्व कार्यक्रमासाठी व भडगाव एरंडोल रोडवरील महेश मंदिर परिसरात भाविकांची चांगलीच गर्दी होती त्यानिमित्ताने कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त ही चोख ठेवला होता त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.



