Breaking
ब्रेकिंग

भडगाव येथील लाडकुबाई विद्यालयात ‘खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान’ या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न…!

भडगाव येथील लाडकुबाई विद्यालयात 'खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान' या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न...!

1 0 5 5 9 9

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव शहरातील दि. २८ जुलै रोजी भडगाव शहरातील  लाडकुबाई विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) शाखा भडगावच्या वतीने *’खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र व विज्ञान’* या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रबोधनात्मक विषयावर व्याख्यान व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ *डॉ. जयंत नारळीकर* यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश

कार्यक्रमाचे प्रास्ताविक *प्रा. दीपक मराठे सर* यांनी केले. त्यांनी आजच्या आधुनिक युगात वैज्ञानिक दृष्टिकोनाची असलेली गरज आणि या विषयाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून *’अंनिस’ भडगाव शाखेचे कार्याध्यक्ष शामकांत पाटील सर* उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फलज्योतिष आणि विज्ञान यातील नेमका फरक, ग्रहांचे वास्तव आणि मानवी जीवनावर त्याचा परिणाम यावर सोप्या भाषेत प्रकाश टाकला.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही भ्रामक समजुतींना बळी न पडता विज्ञानाची कास धरावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या निमित्ताने लाडकुबाई विद्यालयाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये *अंनिसचे एस. डी. पाटील सर, प्रा. दीपक मराठे सर, सुबोध पाटील सर आणि युनूस खान* यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत शांततेत व उत्सुकतेने संपूर्ण व्याख्यान ऐकले आणि कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध उपस्थितीमुळे हा प्रबोधनाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी रीतीने संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवल जोशी सर* यांनी केले, तर आभार *प्रा. दीपक भोसले सर* यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 5 5 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे