Breaking
ब्रेकिंग

पारोळ्यात दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण…!

पारोळ्यात दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण…!

1 0 7 7 0 5

इमरान शेख उपसंपादक

आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारतीमुळे नागरिकांना अधिक गतिमान व पारदर्शक नोंदणी सेवा मिळणार आमदार ॲड. अमोलदादा पाटील

पारोळा :- तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी-१, पारोळा कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भव्य लोकार्पण करण्यात आले. तब्बल २ कोटी ३४ लाख रुपये खर्चातून साकारण्यात आलेली ही प्रशासकीय इमारत आधुनिक व नागरिकाभिमुख सुविधांनी सुसज्ज असून, या इमारतीमुळे पारोळा तालुक्यातील नागरिकांना नोंदणीविषयक सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि सुविधाजनक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जळगांव सहायक निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदारजी कुलकर्णी, जळगांव सह जिल्हा निबंधक वर्ग – २ तथा प्रशासकीय अधिकारी घन्साराम राठोड, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अतुलअण्णा पवार, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, उपनगराध्यक्ष ॲड.रोहनदादा मोरे, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, भाजपा शहराध्यक्ष तथा पारोळा विकासो उपाध्यक्ष मुकुंदा चौधरी, सहाय्यक दुय्यम निबंधक गणेश लोखंडे, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शेतकी संघाचे मा.संचालक राजेंद्र पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, भाजपा प्रतोद तथा नगरसेवक अमोलदादा शिरोळे, नगरसेवक छोटूभाऊ पाटील, नजीरखान बेलदार, विनोद पाटील, दगडू पवार सर, भूषण टिपरे सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांचेसह पत्रकार, पारोळा दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्टॅम्प वेंडर संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, स्टॅम्प वेंडर बांधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

या संपूर्ण प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, पाठपुरावा आणि नियोजन यामुळे हे काम प्रत्यक्षात साकारले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी आधुनिक प्रशासकीय सुविधा दुय्यम निबंधक कार्यालय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेले महत्त्वाचे शासकीय कार्यालय आहे. जमीन-जुमला खरेदी-विक्री, दस्त नोंदणी, विविध करार व इतर महत्त्वाच्या नोंदणी प्रक्रियेसाठी नागरिकांची या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे नागरिकांना आवश्यक त्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, कार्यालयीन कामकाजासाठी प्रशस्त व सुयोग्य जागा मिळावी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कार्यक्षम वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नवीन प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.

निधीतून उभारण्यात आलेल्या या इमारतीमुळे पारोळा तालुक्यातील नागरिकांच्या नोंदणीविषयक कामांना अधिक वेग मिळण्यास मदत होणार असून, शासकीय सेवा देण्याची प्रक्रिया अधिक सुसूत्र होणार आहे.

विकासाला नवा आकार देण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे सांगितले.

“विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती किंवा भौतिक सुविधा उभारणे नव्हे, तर सामान्य नागरिकाला शासनाच्या सेवा अधिक सुलभ आणि सन्मानपूर्वक मिळणे हा देखील विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. पारोळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची ही प्रशासकीय इमारत नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आगामी काळातही पारोळा शहरासह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पारोळा शहराच्या विकासाला आधुनिक स्वरूप देताना प्रशासकीय सुविधांचे बळकटीकरण करण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पारोळ्याच्या विकासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पारोळा शहरामध्ये गेल्या काही काळात विविध पायाभूत सुविधा व प्रशासकीय इमारतींच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. त्याच मालिकेत दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाची २.३४ कोटी रुपयांची नवीन प्रशासकीय इमारत नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे.

या इमारतीमुळे नागरिकांना नोंदणीसाठी अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, कार्यालयीन कामकाजही अधिक कार्यक्षम पद्धतीने पार पडण्यास मदत होणार आहे. त्यामुळे “सुविधांचा विस्तार, विकासाला नवा आकार” या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप मिळाले आहे.

आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या पुढाकारातून साकारलेली ही नवीन प्रशासकीय इमारत पारोळा तालुक्यातील नागरिकांसाठी अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक शासकीय सेवा व्यवस्थेचा नवा अध्याय ठरणार आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 7 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे