Breaking
ब्रेकिंग

भडगावच्या जि. प. उर्दू बॉईज स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा…!

भडगावच्या जि. प. उर्दू बॉईज स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा...!

1 0 8 7 5 4

इमरान शेख उपसंपादक

भडगाव तालुका प्रतिनिधी :- हाय्युम अली सय्यद

भडगाव, शहरातील  दि. 15ऑगस्ट रोजी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन भडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू बॉईज स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

शाळेच्या प्रांगणात भडगाव नगरपरिषद चे प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक तथा आरोग्य सभापती सय्यद इमरान अली सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते आणि भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनीही कार्यक्रमाला रंगत आणली.

शपथ व संदेश

कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त महाराष्ट्र करण्याची शपथ तसेच *साक्षरतेची शपथ देण्यात आली.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व आणि जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार, सुशिक्षित व कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचे आवाहन केले.

उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमाला नगरसेवक सय्यद इमरान अली सय्यद, माजी डेप्युटी सरपंच हाजी ऐतबार खान, माजी नगरसेवक भिकूर खान, हाजी जाकीर कुरेशी, एनाज खान, जुनैद खान, मुंबई पोलिस रिझवान खान, SMC अध्यक्ष नजीर मुजावर, पत्रकार जावेद शेख, पत्रकार  आबरार   मिर्जा आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक व कर्मचारी

केंद्र प्रमुख शारीख सर, मुख्याध्यापक बेग जाहिद, सिद्दिकी लुकमान, नसीरुद्दीन शेख, बागवान नासिर, पटेल शिरीन, वर्षा पाटील, अमीरहमजा सय्यद, तबस्सुम बेगम यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिर्जा तस्लिम सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जय हिंद! जय भारत!!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 8 7 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे