Breaking
ब्रेकिंग

फरकांडे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न…!

फरकांडे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न…!

1 0 6 3 1 4

उपसंपादक :-इमरान शेख

एरंडोल  तालुक्यातील फरकांडे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांना आज गती मिळाली. आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या स्मशानभूमी बांधकामाचे लोकार्पण तसेच ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी सांगितले की, गावांचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून प्रत्येक गावात मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. स्मशानभूमीसारख्या अत्यावश्यक सुविधांबरोबरच ग्रामपंचायत परिसर आणि अंतर्गत रस्त्यांचा विकास केल्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. विकासकामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि मंजूर झालेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमास जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, एरंडोल पंचायत समितीचे मा.सभापती गबाजीआण्णा पाटील, पारोळा शेतकी संघाचे मा.संचालक दासभाऊ पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, आडगांव येथील धीरज पाटील यांचेसह फरकांडे व परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. भूमिपूजनानंतर उपस्थितांनी विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करून ती जनतेच्या सेवेत दाखल करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

फरकांडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या विकासकामांमुळे गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 6 3 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे