Breaking
ब्रेकिंग

एरंडोलच्या आरोग्यदूताचा सन्मान; विक्की खोकरे यांना दादर येथे ‘शरद रत्न पुरस्कार’ प्रदान….!

एरंडोलच्या आरोग्यदूताचा सन्मान; विक्की खोकरे यांना दादर येथे 'शरद रत्न पुरस्कार' प्रदान....!

1 1 4 0 0 2

इमरान शेख उपसंपादक सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क

दादर: आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि निस्वार्थ कार्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आरोग्यदूत तथा मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष युवराज उर्फ विक्की खोकरे यांना अत्यंत मानाचा ‘शरद रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत, (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते विक्की खोकरे यांना शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, राष्ट्रीय संत शिवाचार्य धारेश्वर महाराज, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर, हास्य अभिनेते अरुण कदम, सिने दिग्दर्शक विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

विक्की खोकरे यांनी गेल्या १६ वर्षांपासून ग्रामीण व गरजू भागातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हजारो रुग्णांना जीवनदान देण्याचे तसेच शासकीय आरोग्य योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांच्या याच निरंतर समाजसेवेची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना विक्की खोकरे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, मला वेळोवेळी साथ देणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचा आणि माझ्या पाठीशी असलेल्या रुग्णांच्या आशीर्वादाचा आहे. या सन्मानामुळे समाजसेवेची जबाबदारी आणखी वाढली आहे.”

या सोहळ्याला सिने, राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विक्की खोकरे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि आरोग्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 4 0 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे