ढोमणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन फलकाचे ईश्वर लाला सर यांच्या हस्ते अनावरण…!
ढोमणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन फलकाचे ईश्वर लाला सर यांच्या हस्ते अनावरण...!

जिल्हा प्रतिनिधी:-कलीम सैय्यद
चाळीसगाव तालुक्यातील ढोमणे येथे आज दि ८ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडी_च्या नवीन कार्यालयीन फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. ईश्वर लाला सर यांच्या हस्ते फीत कापून या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय-धोरणांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना ईश्वर लाला सर* म्हणाले, _”वंचित, शोषित, पीडित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. गावागावात पक्ष संघटना मजबूत करून येणाऱ्या निवडणुकीत चांगले यश मिळवू.”
चाळीसगाव तालुकाध्यक्ष श्री. संदीप कांबळे* यांनी ढोमणे येथील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष किरण ताई चाळीसगाव शहराध्यक्ष सागर भाऊ निकम व तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ढोमणे गावातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


