मोठे खेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश मोहन चौधरी यांची बिनविरोध निवड…!
मोठे खेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश मोहन चौधरी यांची बिनविरोध निवड...!

जिल्हा प्रतिनिधी:-कलीम सैय्यद
चाळीसगाव तालुक्यातील मोठे खेडगाव येथे दि १० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी.योगेश मोहन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत सर्व सदस्यांनी एकमताने योगेश चौधरी यांच्या नावाला पाठिंबा दिला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी मिळून घेतलेल्या या निर्णयामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विकासाला प्राधान्य राहील – योगेश चौधरी
निवडीनंतर सर्वांचे आभार मानताना नवनियुक्त उपसरपंच श्री. योगेश चौधरी म्हणाले, सरपंच सौ. उषाताई मरसाळे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे प्राधान्य राहील. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि युवकांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न करेन. सर्वांच्या सहकार्याने मोठे खेडगावचा आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक वाढवू.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी सरपंच सौ. उषाताई मरसाळे. माजी उपसरपंच मोहन जयराम चौधरी.माजी उपसरपंच सौ. वंदनाताई परमेश्वर माळी, विकास सोसायटीचे संचालक संभाजी बाजीराव साळुंखे, छोटू गडबड पाटील. सुनील चौधरी.दीपक साळुंखे, . विजय साळुंखे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी उपसरपंचांकडून शुभेच्छा माजी उपसरपंच मोहन चौधरी आणि वंदनाताई माळी यांनी नवीन उपसरपंचांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गावहितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन केले.
ग्रामपंचायतीच्या एकीच्या निर्णयामुळे मोठे खेडगावमध्ये विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला..



