Breaking
ब्रेकिंग

हॉटेलवाल्यांनो सावधान.! प्लास्टिकमध्ये ‘चहा’ दिल्यास परवाना होणार रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा…!

हॉटेलवाल्यांनो सावधान.! प्लास्टिकमध्ये ‘चहा’ दिल्यास परवाना होणार रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा...!

1 0 3 1 6 4

जिल्हा प्रतिनिधी :-   कलिम सैय्यद

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि चहाच्या टपऱ्यांवर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल चालकांची आता अजिबात खैर नाही. गरम चहा प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या कपात देणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन (FDA) कठोर कारवाई करणार असून, असे प्रकार आढळल्यास हॉटेल्सचे परवाने कायमचे रद्द केले जाऊ शकतात, असा सज्जड दम एफडीएचे धडाडीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

मुंढेंच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख व ठळक मुद्दे:

प्लास्टिकच्या कपांना सक्त मनाई: गरम चहा, कॉफी किंवा अन्य खाद्यपदार्थ प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या कपात देणे आरोग्यास अत्यंत घातक आहे. यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल

मोफत आणि स्वच्छ पाणी बंधनकारक: कोणत्याही हॉटेल किंवा उपाहारगृहात आलेल्या ग्राहकाला पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक आहे  हॉटेल चालकांनी बिलाचा रेटा लावून ग्राहकाला सक्तीने पाण्याची बाटली विकत घेण्यास भाग पाडता येणार नाही

स्वच्छतेबाबत तडजोड नाही: हॉटेलच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता आढळल्यास किंवा निकृष्ट दर्जाचे व काळे पडलेले खाद्यतेल खाद्यतेलाचा पुनर्वापर वापरल्याचे निदर्शनास आल्यास हॉटेल्सवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाईल

नियम पाळा, अन्यथा कुलूप: ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार (FSSAI) दंडात्मक व दंडात्मक कारवाई करून दुकाने सील केली जातील

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, अन्न व औषध प्रशासनाकडून ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व हॉटेल्स, धाबे आणि टपऱ्यांनी सुरक्षित अन्न आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे प्रशासनाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवली जाईल आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही हॉटेलचालकाला सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 3 1 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे