Breaking
ब्रेकिंग

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारोळा तालुका अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड…!

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारोळा तालुका अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड...!

1 0 9 7 7 7

इमरान शेख उपसंपादक

पारोळा, आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ, जळगाव च्या जिल्हाध्यक्ष श्री. देवेंद्रजी देशमुख यांच्या शिफारशीनुसार श्रीमती. भाग्यश्री पाटील यांची पारोळा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल त्यांचे महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मनःपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

महासंघाचे म्हणणे आहे की, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि संघटनेच्या बळकटीकरणासाठी भाग्यश्री पाटील यांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे. त्यांच्या या नव्या जबाबदारीमुळे महासंघाचे कार्य जळगाव जिल्ह्यात अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.

या निवडीमुळे पारोळा तालुक्यातील महिला व मराठा समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

महासंघाच्या वतीने भाग्यश्री पाटील यांच्या पुढील भावी कार्यकाळासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप स्वाभिमानी शुभेच्छा देण्यात आल्या.

जय भवानी! जय शिवराय! जय स्वाभिमानी!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 9 7 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे