राज्य शासनाने हाती घेतलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रम..
राज्य शासनाने हाती घेतलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रम..

प्रतिनिधी :- जैनुल शेख उत्राण
एरंडोल तालुक्यातील शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या “सेवा पंधरवडा कार्यक्रम” अंतर्गत आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी एरंडोल वस्तीतील भिलवस्तीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील नागरिकांचे अर्ज (फॉर्म) भरून घेण्यात आले. माननीय जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार तसेच माननीय तहसीलदार श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री. अमोल बन, सहाय्यक महसूल अधिकारी श्री. अय्याज शेख, महसूल सहाय्यक श्री. विजय कोळी व श्री. विशाल सोनवणे हे उपस्थित राहून लाभार्थ्यांचे अर्ज तपासणी, मार्गदर्शन व पूर्तता याचे कामकाज पाहिले.
लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांची माहिती देणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची सोय यामुळे नागरिकांचा उत्साह वाढला होता. शिबिरात महिलांसह वृद्ध व युवकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे शासनाच्या योजना झोपडपट्टीतील वंचितांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचत असल्याचे समाधान व्यक्त होत असून, शासन-प्रशासनाची लोकाभिमुख भूमिका अधोरेखित झाली आहे.