Breaking
ब्रेकिंग

जळगाव म्युनिसिपल उर्दू स्कूलमध्ये सायबर जनजागृती; विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षिततेचे धडे…!

जळगाव म्युनिसिपल उर्दू स्कूलमध्ये सायबर जनजागृती; विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षिततेचे धडे...!

1 1 2 7 2 0

सत्यकाम न्यूज नेटवर्क जळगाव :-कलिम सैय्यद

जळगाव शहरात दि. १६ सप्टेंबर २०२६ जळगाव येथील म्युनिसिपल उर्दू स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. क्विक हील फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनातून तसेच Cyber Warriors Club, Jalgaon यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन जगात वावरताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. OTP, UPI PIN, अनोळखी लिंक, फेक कॉल, फेक मेसेज, ऑनलाइन बँकिंग फसवणूक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या प्रकारांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीस OTP किंवा UPI PIN देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच फेक कॉल व मेसेजपासून सावध राहावे, असे सांगण्यात आले.

यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या दर्शना चौधरी व टीना पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक ओळखण्याचे मार्ग समजावून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारले. सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 7 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे