
उपसंपादक – कल्पेश महाले
भडगाव – तालुक्यातील मौजे वाक येथील नदीपात्रात काल दिनांक ९ मार्च २०२५ रोजी रात्री २:०० वाजेच्या सुमारास भडगाव महसूल विभागामार्फत अवैध गौणखनिज वाहतूक व उत्खनन यासंदर्भात धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाई मध्ये १ जेसीबी, ३ डंपर मध्ये प्रत्येकी ३ ब्रास अवैध वाळू व १ ट्रॅक्टर मध्ये १ ब्रास अवैध वाळू प्रत्यक्ष घटनास्थळी अवैध उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आले असता सर्व वाहने जप्त करण्यात आले आहेत.
सदर कारवाईतील जप्त वाहने
१)विशाल सुनिल चौधरी रा.पारोळा यांचे १ जेसीबी
२)शैलेश विश्वास पाटील रा.पारोळा यांचे १ डंपर
३)शिवाजी रमेश पाटील रा.पारोळा यांचे १ डंपर
४)विठ्ठल नथ्थु वाघ रा.भडगाव यांचे १ डंपर
५) लक्ष्मण विठ्ठल पाटील रा.पासर्डी यांचे १ ट्रॅक्टर
वरील सर्व वाहने जप्त करुन त्यांना अवैध गौणखनिज वाहतुक दंड आकारण्याची कारवाई सुरु आहे. त्याचबरोबर सदर कारवाई मौजे वाक येथे चालू असतांना भडगाव पेठ भागात देखील अवैध गौणखनिज वाळू वाहतूक करणारे
६) प्रविण नाईक यांचे १ ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात आले.
वरील ६ वाहनांमधून शासनास १८ लाख ४३ हजार १८३ रुपये इतक्या दंडात्मक रकमेचा महसूल प्राप्त होणार आहे.
सदर कारवाई तहसिलदार भडगाव श्रीमती शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली मेहमूद खाटीक तलाठी भडगाव-२, प्रमोद पाटील तलाठी कनाशी, विशाल सुर्यवंशी कोतवाल वाक, उमेश शिरसाठ पोलीस पाटील वाक , रामचंद्र सोनवणे होमगार्ड व मुरलीधर भिल होमगार्ड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
तसेच या कारवाई दरम्यान कुणाल कोळी मंडळ अधिकारी भडगाव, महादु कोळी महसूल सहाय्यक, प्रशांत कुंभारे तलाठी टोणगाव, विलास शिंदे तलाठी कोळगाव, पाशा हलकारे तलाठी वाक, राजेंद्र शेवरे कोतवाल वडजी, लोकेश वाघ वाहनचालक, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील, संभाजी पाटील पोलीस वाहनचालक, चंद्रकांत पाटील होमगार्ड सोमनाथ नरवाडे होमगार्ड हे पथक देखील सहभागी झाले होते.
यापुढे देखील अशीच अवैध वाळु चोरी विरुध्द धडक कारवाई करण्यात येणार असल्याचा मानस मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी श्री.भुषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव तहसिलदार श्रीमती शितल सोलाट यांनी व्यक्त केला आहे.