प.पू.श्री सद्गुरू गोविंद महाराज नामाच्या गजरात” हरीनाम सप्ताहाची सांगता कासोदा येथे …!
प.पू.श्री सद्गुरू गोविंद महाराज नामाच्या गजरात" हरीनाम सप्ताहाची सांगता कासोदा येथे ...!

कासोदा प्रतिनिधी :-
येथे भाद्रपद अष्टमी रोजी, प.पू. श्री सदगुरु
गोविंद महाराज यांच्या नावाने सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि. ७ सप्टेंबर रविवार रोजी करण्यात आली. येथील महादेव मंदिरात भाद्रपद अष्टमीला हरिनाम सप्ताह स्थापनेसाठी बसलेले जोडपे सप्ताहाच्या सांगताच्या दिवशी तेच पाच जोडपे सहपत्निक बसवण्यात आले व त्यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने श्री विष्णूनारायानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सविस्तर वृत्त…
महाराष्ट्रातील नंबर दोन तर जिल्ह्यातील सर्वात मोठा गेल्या ७२ वर्षांपासून असलेला अखंड हरीनाम सप्ताहाची दि.७ सप्टेंबर रविवार रोजी सांगता करण्यात आली. औसकाळी ६ वाजता भव्य दिव्य अशी काकडा आरती करण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा सोहळा होता. आरतीला हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील, मा. पालकमंत्री सतिष पाटील यांनी उपस्थित लावली. त्यानंतर सकाळी श्री ह.भ.प. संभाजी महाराज अहिल्यानगर यांचे ८:३० ते १०:३० वाजेदर्म्यान कल्याचे किर्तन झाले.
त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कासोदा व परिसरातील तसेच पाहुणे मंडळी यांनी मोठया संख्येने उपस्थिती देऊन ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभघेतला. तसेच मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा पाटील मित्र परिवार पारोळा यांच्याकडून मोफत जलसेवा देण्या आली.
त्यानंतर मुलींनी ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत ठेका धरला. तसेच संध्याकाळी ६ वाजता गावातील मंडळांनी लावलेली वाजंत्री ढोल ताशे आपआपल्या जागेवरून वाजत गाजत येथील महादेव मंदिर परीसरात येऊन क्रमाक्रमाने लाईनीत लागले.
त्यात शिवराय मित्र मंडळ, कुस्तीगीर महासंघ बजरंग गृप, शिवनेरी मित्र मंडळ, बापूसाहेब मित्र परिवार, विरसावरकर, रामराज्य गृप, जय सियाराम मित्र मंडळ, शिवसाधना मित्र मंडळ, त्रिमुर्ती मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, सम्राट मित्र मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ आदींनी ढोल ताशांच्या आवाजात वाजंत्री वाजून गुलाल उधळत सहभाग घेतला.
हिंदू मुस्लिम एकतेचे घडते दर्शन…
येथे गेल्या ७२ वर्षांपासून सप्ताह मिरवणुक तीनही मशीद जवळून जात असते, त्यावेळी मुस्लिम पंच कमिटीकडून पालखीचा मान राखून पालखीला श्रीफळ देऊन कार्यक्रमात शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करतात. याच्यातून येथील हिंदू मुस्लिम एकोप्याचा संदेश सर्व दूर जात असतो.
येथुन पालखी सुतार गल्ली, दाभाडे गगल्ली, गढी भाग शेलार गल्ली, वाघ वाडा, काकासट चौक ठाकरे गल्ली, बिर्ला चौक, पांडे गल्ली, सादिकशाह बाबा दर्गा, मार्गे पालखी सकाळी ७ वाजता महादेव मंदिरात आणण्यात आली त्यानंतर गोपाळकाल्याने सप्ताहाची सांगता करण्यात आली. मिरवणूक व पालखी दर्शनासाठी रात्रभर हजारो भक्तांचा जनसागर उसळला होता
यावेळी कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो.नी. निलेश राजपूत, पि.एस.आय. धर्मराज पाटील स. फौ. सहदेव घुले, पो. कॉ. नितीन सुर्यवंशी, योगेश पाटील, लहू हटकर, समाधान तोंडे, स्वप्नील परदेशी , कुणाल देवरे, योगेश पाटील, निलेश गायकवाड, राकेश खोंडे, जिल्हा मुख्यालय, व जिल्ह्यातील पोलिस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी, RCP जळगाव, स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, होमगार्ड, परिसरातील पोलीस पाटील आदींसह तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोबत महावीजवितरण मंडळाचे कर्मचारी वृंद, पत्रकार बांधव, सर्व पक्षीय राजकीय नेते उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगांव भाग एस.डी.पी.ओ विजयकुमार ठाकूरवाड व स.पो.नि.निलेश राजपूत स्वःत शेवटपर्यंत मिरवणुक शांततेत पार पडावी म्हणुन रात्रभर गस्त ठेऊन होते.
मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर हरीनाम सप्ताह हिंदू पंच मंडळ कमिटी यांच्याकडून कासोदा पोलीस स्टेशन व कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सगळे लेझिम मंडळ यांचे शब्द सुमनांनी धन्यवाद व्यक्त करून आभार मानण्यात आले.