ब्रेकिंग
कानबाई माता विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष...!

0
8
1
3
7
5
कासोदा प्रतिनिधी :-इमरान शेख
खान्देश कुलस्वामिनी कानबाई मातेला आज
निरोप देण्यात आला. शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आल्या. संपूर्ण शहरात कानबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. “चांगला पाऊस पडू दे व बळीराजाचे राज्य येऊ दे” असे साकडे घालण्यात आले.
कानबाई मातेचे रविवारी आगमन झाले होते. भाविकांनी रात्रभर जागरण केले. रात्रभर पारंपारिक गीते सादर केली. त्यानंतर सोमवारी सकाळी कानबाई मातेला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणूकीला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला. भाविकांनी ढोल ताशे, डिजेच्या गजरात नृत्य केले. महिलांनी फुगडी खेळत कानबाई मातेला निरोप दिला.
0
8
1
3
7
5