
कासोदा : कासोदा हि एरोंडोल तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. चलन चे गाव असल्याने गावात नेहमी चहल – पहल असते. त्यामुळे गावात ठीक ठिकाणी अवैध दारू, सट्टा मटका जुगार मोठ्या प्रमाणात खेळले जातात. जुगार व सट्टा अड्डयावर पोलिसांनी धाड टाकुन १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कासोदा येथे जुम्मा मशीद जवळील परिसरात ही कारवाई करण्यात आली.
स्वतःचे फायद्यासाठी पैसे स्वीकारून सट्टा जुगार घेत आहे. अशी माहिती मिळताच
पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता, यावरून पोलिसांनी त्यांच्या जवळील रोख रक्कम ५ हजार रु. व १० हजार रु. किमतीचा मोबाईल असे एकूण १५ हजार रु. किमतीचा एवज जप्त केला.
याबाबत पो.कॉ. समाधान तोंडे यांनी कासोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने समाधान संतोष चौधरी (वय अंदाजे ४०, रा. कासोदा), याच्या विरुद्ध बेकायदा मटका खेळविल्याप्रकरणी सिसिटीएनएस नं. ११९/२०२५ नुसार महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम कलम १२ (अ )अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सपोनी. निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शना खाली कासोदा पोलिस करीत आहेत.