Breaking
ब्रेकिंग

गिरड येथे आदिवासी बांधवांसाठी २० लाखांचे सामाजिक सभागृह उभारणार आमदार अमोल दादा पाटील यांचे ठोस आश्वासन…!

गिरड येथे आदिवासी बांधवांसाठी २० लाखांचे सामाजिक सभागृह उभारणार आमदार अमोल दादा पाटील यांचे ठोस आश्वासन...!

1 0 4 2 1 8

भडगाव तालुक्यातील गिरड येथली आदिवासी बांधवांना त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भडगाव तालुक्यातील गिरड गावात २० लाख रुपये खर्चून भव्य सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे. एरंडोल-पारोळा भडगाव मतदारसंघाचे आमदार अमोल दादा पाटील यांनी हे ठोस आश्वासन दिले आहे.

आज गिरड येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल दादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात येऊन सस्नेह भेट घेतली. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी गावात सामाजिक सभागृहाची तातडीची गरज असल्याचे सांगितले. गावातील लग्न, सण, शासकीय योजना, बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागा नसल्याने अडचणी येत असल्याची मागणी त्यांनी केली.

आदिवासी बांधवांची ही मागणी रास्त असल्याचे नमूद करत आमदार अमोल दादा पाटील म्हणाले,

“समाजातील शेवटच्या घटकाचा विकास आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. गिरड येथील आदिवासी समाजासाठी २० लाख रुपयांचे सामाजिक सभागृह देण्याचे मी आश्वासित करतो. हे सभागृह केवळ एक इमारत नसून, ते आदिवासी संस्कृतीचे जतन करणारे आणि समाजाला एकत्र आणणारे हक्काचे केंद्र ठरेल.

मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित

यावेळी गिरड गावातील आदिवासी बांधव, ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहामुळे गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींना नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

आमदार पाटील यांनी पुढे सांगितले की, “हा शब्द केवळ आश्वासन नसून या कामाला लवकरात लवकर गती देऊन ते प्रत्यक्ष पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

विकासकामांचा ध्यास, जनतेचा विश्वास!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 2 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे